गुरुकृपेने होतसे मोक्षाचा मार्ग मोकळा ।

गुरुकृपायोगानुसार साधना सांगणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले
पू. शिवाजी वटकर

संत कबीरदास म्हणे ।
यह तन विष की बेलरी ।
गुरु अमृत की खान ।
शीश दिए जो गुरु मिले ।
तो भी सस्ता जान ॥ १ ॥

गुरुकृपायोगी (टीप १) साधक बोले ।
न द्यावे लागे आपुल्या मस्तका ।
न सोडावे लागे आपुल्या व्यवहारा ।
गुरुकृपेने जीवनात वहातो आनंदाचा झरा ॥ २ ॥

न जावे लागे वनांतरा ।
न करावी लागे कठोर तपश्‍चर्या ।
न द्यावी लागे धनाची मोठी दक्षिणा ।
गुरुकृपेने होतसे मोक्षाचा मार्ग मोकळा ॥ ३ ॥

टीप – परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी काळानुसार अखिल मानवजातीच्या शीघ्र आध्यात्मिक उन्नतीसाठी शोधलेला साधनामार्ग. यामध्ये ‘१. स्वभावदोष-निर्मूलनासाठी प्रयत्न करणे, २. अहं-निर्मूलनासाठी प्रयत्न करणे, ३. नामजप, ४. सत्संग, ५. सत्सेवा, ६. भावजागृतीसाठी प्रयत्न करणे, ७. सत्साठी त्याग आणि ८. इतरांविषयी प्रीती (निरपेक्ष प्रेम)’ ही साधनेची अष्टांगे सांगितली आहेत.

– (पू.) श्री. शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (३०.६.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक