पंडित नथुराम गोडसे यांना ‘देशभक्त’ म्हणणारे ट्वीट केल्यावरून झालेल्या वादानंतर आंध्रप्रदेशातील भाजप नेत्याने ट्वीट हटवले !

अमरावती (आंध्रप्रदेश) – आंध्रप्रदेशातील भाजपचे नेते एन्. रमेश नायडू यांनी मोहनदास गांधी यांची हत्या करणारे पंडित नथुराम गोडसे यांना ‘देशभक्त’ म्हणणारे ट्वीट केले होते; मात्र त्यावरून वाद झाल्यावर त्यांनी हे ट्वीट हटवले.

नायडू यांनी ट्वीटमध्ये म्हटले होते की, ‘मी असे ट्वीट केले नाही, तर माझे खाते हाताळणार्‍याने असे ट्वीट केले आहे.’ या ट्वीटमध्ये ‘नथुराम गोडसे यांच्या पुण्यतिथीवर मी त्यांना नमन करतो. ते भारतभूमीमध्ये जन्माला आलेल्या खर्‍या आणि महान देशभक्तांपैकी एक होते’, असे म्हणण्यात आले होते.