२८ मार्चपर्यंत उत्तर-मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

 

पुणे – २६ ते २८ मार्च या कालावधीत उत्तर-मध्य महाराष्ट्रात विजांचा कडकडाट आणि वादळी वारे यांच्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, पुणे, नगर आणि नाशिक येथे पाऊस पडण्याची शक्यता आहे.