आज रत्नागिरी येथे ‘जीवनदान ग्रुप’च्या माध्यमातून  रक्तदान शिबिराचे आयोजन

रत्नागिरी – जिल्हा शासकीय रक्तपेढीच्या मागणीनुसार ‘जीवनदान ग्रुप’च्या माध्यमातून २६ मार्च या दिवशी रक्तदान शिबिराचे आयोजन नाचणे गोडाऊन स्टॉप येथे करण्यात आले आहे. यासाठी ५० रक्तदात्यांची सूची सिद्ध असल्याची माहिती ‘जीवनदान ग्रुप’कडून देण्यात आली आहे.

याविषयी अधिक माहिती देतांना ग्रुपचे अध्यक्ष राजू नार्वेकर यांनी सांगितले की,  उद्याचे आमचे ३० वे रक्तदान शिबिर आहे.  रत्नागिरी जिल्हा शासकीय रक्तपेढीच्या मागणीनुसार उद्या तातडीने रक्तदान शिबिर गुरुवार, २६ मार्च २०२० या दिवशी साईमंदिर, नाचणे गोडावून स्टॉप येथे सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत आयोजित केलेले आहे.

जीवनदान ग्रुपची स्थापना ९ जानेवारी २०१६ मध्ये झाली. या ग्रुपचा ‘रक्तदान हाच मुख्य उद्देश आहे.’ जिल्हा रक्तपेढीने केलेल्या आवाहनाला ‘जीवनदायी ग्रुप’ने प्रतिसाद दिला आहे. रक्तदान स्थळापर्यंत ये-जा करण्यासाठी पोलिसांचे सहकार्य लाभणे अपेक्षित आहे.