अवेळी पडलेल्या पावसामुळे पिकांची हानी

पुणे, २५ मार्च (वार्ता.) – २४ मार्चला रात्री आणि २५ मार्चला सकाळी पुणे, संभाजीनगर, नाशिक, जळगाव अन् बुलढाणा या जिल्ह्यांत जोरदार वार्‍यासह पाऊस पडला. पाऊस पडल्याने हवेत गारवा निर्माण झाला होता. अवेळी पडलेल्या पावसामुळे पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.