दळणवळणबंदीचे उल्लंघन केल्यास होऊ शकतो ६ मासांचा कारावास

नवी देहली – कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशातील अनेक राज्यांमध्ये ‘लॉकडाऊन’ (दळणवळणबंदी) करण्यात आले आहे. या लॉकडाऊनची कठोरपणे कार्यवाही करण्याचे आणि त्याचे उल्लंघन करणार्‍यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश केंद्रशासनाने राज्यांना दिले आहेत. दळणवळणबंदीमध्ये कलम १८८ अंतर्गत नियमांचे उल्लंघन करणार्‍यांना ६ मास कारावास भोगावा लागू शकतो किंवा १ सहस्र रुपये दंड ठोठावला जाईल, असे वृत्त ‘इंडियन एक्स्प्रेस’ या इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.