आयकर परतावा भरण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ

नवी देहली – अनेक राज्यांनी दळणवळणावर बंदी घातल्याच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने करदात्यांच्या दृष्टीने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी २४ मार्चला वस्तू आणि सेवा (जी.एस्.टी.) अन् आयकर परतावा यांविषयी महत्त्वपूर्ण घोषणा केली. या वेळी सीतारामन् यांनी सांगितले, ‘विवाद से विश्‍वास’ योजना, पॅनकार्ड-आधार जोडणी, जी.एस्.टी. आणि आयकर परतावा यांना ३ मासांची म्हणजेच ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी ३१ मार्च ही अंतिम मुदत होती.