सोलापूर येथे १ मे या दिवशी नवीन न्यायालयाच्या इमारतीचा पायभरणी कार्यक्रम !

जिल्हा न्यायालयाची सध्याची इमारत न्यायालयीन कामकाजासाठी अपुरी पडत असल्याने नव्या इमारतीच्या बांधकामाचा पायाभरणी समारंभ येत्या १ मे या दिवशी होणार आहे.

नाशिकरस्ता येथे मधमाशांचा ७० नागरिकांना चावा !

येथील जुने न्यायालय परिसरातील पिंपळाच्या झाडावर अनेक वर्षांपासून मधमाशांचे पोळे आहे. २३ एप्रिल या दिवशी सायंकाळी अचानक सर्व मधमाशांनी पोळ्यावरून उठत परिसरातील ७० ते ८० नागरिकांवर आक्रमण करत त्यांचा चावा घेतला.

‘स्टेट बँक ऑफ इंडिया’कडून भांडी धुण्यासाठी अत्याधुनिक यंत्र स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाला भेट !

‘श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळा’स ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’कडून ‘सी.एस्.आर्.’ (सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी देण्यात येणारा निधी) निधीतून ताट, वाट्या धुण्यासाठी अत्याधुनिक यंत्र (डिश वॉशर मशीन) अन्नछत्र मंडळाला भेट देण्यात आले.

Bajrangdal Chikmagalur : चिक्कमगळुरू (कर्नाटक) येथे बजरंग दलाच्या माजी पदाधिकार्‍यांना तडीपारीचा आदेश !

काँग्रेस सरकार हिंदूंवर आक्रमण करणार्‍या धर्मांध मुसलमानांना तडीपार करण्याचा आदेश कधीच देत नाही, हे लक्षात घ्या !

नाशिक येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप खैरे यांच्यासाठी लोकसभा निवडणुकीचा अर्ज घेतला !

नाशिक लोकसभा जागावाटपात मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभेचा अर्ज मागे घेतल्यानंतर विविध घडामोडी घडत आहेत.

नंदुरबार येथे लाचखोर प्रभारी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्याविरुद्ध जमाव संतप्त !

असे पोलीस जनतेचे रक्षक नसून भक्षकच आहेत, असे म्हटल्यास त्यात चूक काय ?

Loksabha Elections 2024 : धर्माच्या आधारे मते मागण्याच्या आरोपावरून भाजपचे तेजस्वी सूर्या यांच्यावर गुन्हा नोंद !

निवडणूक आयोगाच्या कर्नाटक राज्याच्या अध्यक्षांनी यासंदर्भात ‘एक्स’वरून पोस्ट करत म्हटले की, सूर्या यांनी सामाजिक माध्यमांवरून एक व्हिडिओ प्रसारित करून धर्माच्या आधारावर मते मागण्याचा प्रयत्न केला आहे.

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने जलसंपदा विभागाचे थकवले ४० कोटी रुपये !

कोट्यवधी रुपयांची थकबाकी करणारी महापालिका जिल्ह्याचा कारभार कशी करत असेल ? संबंधित अधिकार्‍यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !

नगरमध्ये २७ ते २९ एप्रिल या कालावधीत गीतेवर प्रवचनमालिका !

येथील ‘ग्रंथराज दासबोध वाचन निरूपण मंडळा’च्या वतीने शनिवार, २७ ते सोमवार, २९ एप्रिल २०२४ या कालावधीत रासनेनगरमधील श्रीदुर्गामाता मंदिराच्या सभागृहात सायंकाळी ६ ते रात्री ७ या वेळेत श्रीमद्भगवद्गीतेवरील प्रवचनमालिकेचे आयोजन करण्यात आले आहे

‘आर्.टी.ई.’च्या अंतर्गत बेळगाव जिल्ह्यात ४० शाळा पात्र : एकाही इंग्रजी शाळेचा समावेश नाही !

जिल्ह्यात ५ किलोमीटर अंतरात सरकारी शाळा नसेल, तरच ‘आर्.टी.ई.’च्या (‘शिक्षण हक्क’च्या) अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येतो, अशी नवी नियमावली असल्याने बेळगाव जिल्ह्यात ४० शाळा ‘आर्.टी.ई.’च्या अंतर्गत प्रवेशाकरिता पात्र ठरल्या आहेत.