रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय   

‘हिंदु राष्ट्र निश्चितच येणार आहे’, असा विश्वास बळावला. अत्यंत आनंदाची अनुभूती आली. येथे पुन्हा येण्याची उत्कट इच्छा जागृत झाली. आश्रमात कसलीच त्रुटी दिसली नाही.

सनातनचे सद्गुरु (कै.) डॉ. वसंत आठवले यांचे सुपुत्र आणि प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. कमलेश आठवले यांची कुटुंबियांसह रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाला भेट !

डॉ. कमलेश आठवले हे प्रसिद्ध बालरोगतज्ञ असून गेल्या अनेक वर्षांपासून ते अमेरिकेत वास्तव्यास आहेत. नॉर्थ कॅरोलिना राज्यात असलेल्या डरहॅम शहरातील ड्यूक विद्यापिठात ते प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

ठाणे येथील योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांचे सुपुत्र पू. शरदकाका वैशंपायन यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

३ डिसेंबर या दिवशी सनातनचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी एका अनौपचारिक भावसोहळ्यात पू. शरदकाका यांचा शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सन्मान केला. सद्गुरु डॉ. गाडगीळ यांनी ‘तुमच्या रूपात प्रत्यक्ष योगतज्ञ प.पू. दादाजी आले आहेत’, असे पू. शरद काका यांना भावपूर्ण निवेदन केले.

श्रीमती सुमन देवगण यांची रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाला भेट !

देहली येथील सुगम गायिका श्रीमती सुमन देवगण यांनी २७ नोव्हेंबर २०२३ या दिवशी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

आश्रमात मला आनंदाची अनुभूती आली. आश्रमात ज्ञानार्जन केले जाते. ‘आम्हाला अजून पुष्कळ काही शिकायचे आहे’, याची मला जाणीव झाली. अशा प्रकारचा आश्रम प्रत्येक राज्यातील जिल्ह्यांमध्ये होणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व वयोगटातील लोकांना याचा लाभ होऊ शकेल.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय !

येथील साधकांची सेवा प्रशंसनीय आहे. ‘ती अशीच निरंतर चालू रहावी आणि ईश्वराने मला परत आश्रमात येण्याची संधी द्यावी’, अशी त्याच्या चरणी प्रार्थना !’

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

आश्रम पाहून ‘इथेच रहावे आणि स्वतःला पूर्णपणे ईश्वराच्या सेवेत वाहून घ्यावे’, असे मला वाटत आहे. एवढा चांगला, सर्व सोयींनी युक्त, तसेच भक्तीमय आणि आध्यात्मिक आश्रम मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा पाहिला.’

प्रख्यात प्रवचनकार भारताचार्य सु.ग. शेवडे यांची सनातन संस्थेच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमाला भेट

भारताचार्य सु.ग. शेवडे (वय ८९ वर्षे) यांनी १९ ऑक्टोबर २०२३ या दिवशी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांनी आश्रमात चालणार्‍या राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या कार्याची माहिती जाणून घेतली.

बेंगळुरू (कर्नाटक) येथील प्रसिद्ध उद्योजक आणि हिंदुत्‍वनिष्‍ठ संजय गुप्‍ता यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमाला सदिच्‍छा भेट !

आश्रम पाहून अभिप्राय व्‍यक्‍त करतांना श्री. संजय गुप्‍ता म्‍हणाले की, आश्रमातील वातावरण शांत आणि स्‍थिर आहे. साधक आश्रमात राहून पूर्ण समर्पणभावाने करत असलेले कार्य अद़्‍भुत आहे.

मध्‍यप्रदेशातील डॉ. विष्‍णु जोबनपुत्र यांची सपत्नीक रामनाथी येथील सनातनच्‍या आश्रमाला सदिच्‍छा भेट !

मध्‍यप्रदेशमधील विदिशा जिल्‍ह्यातील आनंदपूर येथील ‘श्री सद़्‍गुरु सेवा संघ ट्रस्‍ट’चे विश्‍वस्‍त आणि सद़्‍गुरु संकल्‍प नेत्र चिकित्‍सालयाचे संचालक  डॉ. विष्‍णु जोबनपुत्र अन् त्‍यांच्‍या पत्नी सौ. भारती जोबनपुत्र यांनी सनातनच्‍या आश्रमाला सदिच्‍छा भेट दिली.