१. महंत आचार्य पीठाधीश्वर डॉ. अनिकेतशास्त्री देशपांडे, अखिल भारतीय संत समिती, धर्म समाज, महाराष्ट्र प्रदेश प्रमुख
१. ‘रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहिल्यावर ‘मी कलियुगातील नव्हे, तर सत्ययुगातील आश्रमात वावरत आहे’, असे मला वाटले.
२. मी माझ्या वयाच्या ३३ वर्षांत देश-विदेशांतील ३३ सहस्रांहून अधिक आश्रम पाहिले आहेत. त्यामध्ये रामनाथी येथील सनातनचा आश्रम पहिल्या क्रमांकावर आहे; कारण येथील स्पंदने, आध्यात्मिक वातावरण, साधकांची विनम्रता, उच्च कोटीचे धार्मिक आचरण, विज्ञान अन् अध्यात्म यांचा सुरेख संगम येथे पहायला मिळतो. ‘मी एका दैवी आश्रमात आहे’, असे मला अनुभवता आले.
३. मी इतर ठिकाणी बाहेर गेलो, तर चहा आणि अल्पाहार कुठेच घेत नाही; परंतु सनातनच्या आश्रमात मला आतून चांगली स्पंदने जाणवल्यामुळे मी आश्रमात प्रसाद आणि महाप्रसाद ग्रहण केला.
२. एक संत
१. ‘यापूर्वी मी या अधिवेशनाला येऊ शकलो नाही’, याची मला खंत वाटते.
२. येथे हिंदु राष्ट्र स्थापना आणि धर्मसंस्थापना यांचे कार्य फार व्यापक प्रमाणात चालू आहे. मी अन्य मोठ्या हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यक्रमाला जात असतो; परंतु येथे आल्यावर सनातन धर्माचे कार्य पाहून मी प्रभावित झालो आहे. मी या धर्मकार्यासाठी कुंभमेळ्यात सर्वतोपरी साहाय्य करीन.
३. अन्य संत महात्म्यांनी एकदा तरी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात येऊन पहायला हवे. येथे हिंदु राष्ट्राचेच व्यवस्थापन आहे.
४. गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) महान दैवी महात्मा आहेत. मला त्यांच्या सहवासात उच्च कोटीचे सात्त्विक आणि दैवी वातावरण अनुभवता आले. गुरुदेवांनी ज्या प्रकारे साधकांना घडवले आहे, ते पुष्कळच अलौकिक आहे. असे साधकच रामराज्याचा (‘हिंदु राष्ट्रा’चा) पाया रचतील. या कार्यासाठी गुरुदेवांच्या चरणी नमन !’