रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

गोवा येथील सनातनचा चैतन्यमय रामनाथी आश्रम

१. श्री. सुरेश बाविस्कर (सचिव, मंगलग्रह सेवा संस्था), जळगाव, महाराष्ट्र.

अ. ‘आश्रम पाहून मला अतिशय समाधान झाले.

आ. एवढ्या बारीक गोष्टींचा अभ्यास येथे केला जातो, हे विशेष आहे.’

२. श्री. विनोद कदम (विश्वस्त, मंगलग्रह सेवा संस्था), जळगाव, महाराष्ट्र.

अ. ‘साधकांनी पुष्कळ चांगली माहिती दिली आणि धर्माविषयी सविस्तर माहिती दिली.

आ. येथे शिस्तबद्ध नियोजन आणि शांत वातावरण आहे.

इ. माझे मन प्रसन्न झाले.’

३. श्री. अनिल अहिरराव, (विश्वस्त, मंगलग्रह सेवा संस्था), जळगाव, महाराष्ट्र.

अ. ‘आश्रम अप्रतिम आहे.

आ. माझे अंतर्मन शुद्ध झाले.

४. श्री. जयवंत बाबुराव राय (विश्वस्त, श्री वेतोबा देवस्थान), आरवली, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र.

अ. ‘आश्रम पाहून मला समाधान वाटले.

आ. मला आश्रमात ईश्वरी शक्तीच्या सकारात्मक तत्त्वाची अनुभूती आली.

इ. आश्रमात सेवाभाव आणि अध्यात्म यांची घातलेली सुरेख सांगड पाहून मला समाधान वाटले.’

५. श्री. देवदत्त गणपत कामत, वेंगुर्ला, महाराष्ट्र.

अ. ‘आश्रमात हिंदु संस्कृती काटेकोरपणे जपली जाते.’

६. श्री. संजीव अप्पाजी पाटील, मडगाव, गोवा.

अ. ‘मला आश्रमात पुष्कळ आध्यात्मिक ऊर्जा जाणवली.

आ. आश्रमात चैतन्य आहे.’

७. श्री. विजय शामराव पवार, जि. सातारा, महाराष्ट्र.

अ. ‘या प्रदर्शनातून आपण जे विविध प्रयोग केले आहेत, त्यांचा मानवाच्या प्रगतीमध्ये आणि एकूण व्यक्तीमत्त्वावर कशा प्रकारे उपयोग होतो ?’, हे समजले.’

८. श्री. विजयकुमार विठ्ठल साळुंखे, पुणे, महाराष्ट्र.

अ. ‘अतिशय छान वाटले.

आ. ‘दैवी शक्ती या प्रभामंडळात आहे’, याची निश्चिती वाटली.’

९. श्री. ज्ञानराज मोरेश्वर शिंदे, सातारा, महाराष्ट्र.

अ. ‘हे सूक्ष्म जगत् असे आहे की, हा अनुभव शब्दांत व्यक्तच करू शकत नाही.

आ. आनंदाचे उगमस्थान, म्हणजे हे सूक्ष्म दर्शनाचे प्रदर्शन !’

सूक्ष्म जगताविषयी अभिप्राय

१. श्री. ज्ञानसागर जवकर (जगदंब प्रतिष्ठान), बीड, महाराष्ट्र.

अ. ‘विशेष, असे नवल वाटले.

आ. आम्हाला याची माहिती यापूर्वी नव्हती.’

२. श्री. प्रदीप मलिये (संस्थापक अध्यक्ष, जय बजरंग युवा शक्ती संघ), दर्यापूर, अमरावती.

अ. ‘नवीन पिढीला चालना मिळेल’, असे मला वाटले.’

३. श्री. विनोद मधुकर कदम (विश्वस्त, मंगलग्रह सेवा संस्था), जळगाव, महाराष्ट्र.

अ. ‘साधना करणे किती महत्त्वाचे आहे !’, हे मला समजले.’

(सर्व सूत्रांचा दिनांक : २९.६.२०२४)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत
  • सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला सूक्ष्म-जगत् असे संबोधतात.