रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय

सनातनचा चैतन्यमय रामनाथी आश्रम

१. श्री. रामचंद्र पाटील, शेरे (ता. कराड, जि. सातारा), महाराष्ट्र.

अ. ‘मला आश्रम पाहून पुष्कळ आनंद वाटला.

आ. प्रत्येक गोष्ट व्यवस्थित आणि सुबक आहे.

इ. साधी रांगोळी पाहिली, तरी तिच्यामध्ये देवच दिसतो. इथे प्रत्येक गोष्टीत देवाविना काही नाही.

ई. आश्रमात सर्वत्र सात्त्विकता जाणवली.’

२. आनंदाराव लक्ष्मण कदम, वाई (जि. सातारा)

अ. ‘आश्रमात सर्वत्र स्वच्छता आणि टापटीप पुष्कळ चांगली आहे.

आ. हिंदुंना ठाऊक नसलेल्या अनेक गोष्टी मला येथे आल्यावर समजल्या.

इ. स्वयंपाकघर अतिशय चांगल्या प्रकारे ठेवले असून धान्याची साठवण इत्यादी सर्वच गोष्टी चांगल्या प्रकारे केल्या आहेत.’

३. श्री. सदानंद शंकर कापूरकर, रेठरे बुद्रुक (ता. कराड, जि. सातारा), महाराष्ट्र.

अ. ‘हिंदु धर्मासाठी असे काही कार्य चालले आहे’, हे मला हा आश्रम पाहिल्यानंतरच समजले.

आ. आश्रम पाहून मला स्वर्गसुख मिळाल्याचा आनंद झाला.’

४. महादेव शामराव यादव, सोळशी (ता. कोरेगाव, जि. सातारा), महाराष्ट्र.

अ. ‘आपण धर्मासाठी करत असलेल्या कामाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

आ. आपल्या समवेत आम्हालाही राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात योगदान देण्याची संधी मिळावी.

इ. आपल्याला पुष्कळ शुभेच्छा.’ (सर्व सूत्रांचा दिनांक जून २०२४)