रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

सनातनचा चैतन्यमय रामनाथी आश्रम

१. श्री. राजेश शेवाळे, विश्वस्त, दत्तमंदिर, मंचर, पुणे, महाराष्ट्र.

अ. ‘आश्रम पुष्कळच छान आहे. माझ्या मनात सकारात्मक भाव निर्माण झाला.

आ. ‘आश्रमात हिंदु राष्ट्र आहे’, याची मला प्रचीती आली.’

२. श्री. मोरेश्वर दशरथ शेटे , वडगाव, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे, महाराष्ट्र.

अ. ‘आश्रमात पुष्कळ चैतन्य आहे.

आ. मला आश्रमात आल्यानंतर इकडून निघण्याची इच्छा झाली नाही.

इ. मला पुष्कळ आनंद झाला.’

३. श्री. संजय जिजाबा थोरात, मंचर, तालुका आंबेगाव, पुणे, महाराष्ट्र.

अ. ‘हिंदुत्वाची जेथे प्रचीती, तेथे कर माझे जुळती ।

आ. आश्रम अलौकिक आणि अप्रतिम आहे.

इ. हिंदुत्वासाठी चाललेले कार्य पाहून मला पुष्कळ अभिमान वाटला.

ई. मला हिंदुत्वाचे कार्य करण्यासाठी प्रचंड ऊर्जा मिळाली.

ई. ‘प्रत्येक गावात असे आश्रम व्हावेत’, अशी परमेश्वराकडे प्रार्थना !

उ. समस्त हिंदू आपले ऋणी आहेत.

ऊ. आपल्या राष्ट्रकार्याला आणि धर्मकार्याला प्रणाम !’

४. श्री. गोरख जगन्नाथ रसाळ, बोरीबेल, तालुका दौंड, जिल्हा पुणे, महाराष्ट्र.

अ. ‘आश्रम पाहून मनाला पुष्कळ आनंद वाटला.

आ. आश्रमातील स्वच्छता आणि टापटीपपणा अत्यंत सुंदर आहे.’

(सर्व सूत्रांचा दिनांक : २४.६.२०२४)

सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन पाहून मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

१. श्री. राजेश शेवाळे, विश्वस्त, दत्तमंदिर, मंचर, पुणे, महाराष्ट्र.
अ. ‘सूक्ष्म जगताविषयी निरीक्षण केल्यावर भाव जागृत होतो आणि ईश्वरी चिंतनात वाढ होते.’

२. श्री. गोरख जगन्नाथ रसाळ, बोरीबेल,
तालुका दौंड, जिल्हा पुणे, महाराष्ट्र.
अ. ‘आश्रमातील वातावरण पाहून सनातन धर्मातील आचरण कसे असावे’, याचे भविष्यकाळातील पिढीला अत्यंत मोलाचे मार्गदर्शन होणार आहे.’ (सर्व सूत्रांचा दिनांक : २४.६.२०२४)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक