‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’ला उपस्थित हिंदुत्वनिष्ठांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट !

२४ ते ३० जून २०२४ या कालावधीत रामनाथी, गोवा येथे ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ झाला. या महोत्सवात सहभागी झालेले संत आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली आणि येथील कार्याची ओळख करून घेतली.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय

डावीकडून नाशिक येथील पुरोहित महासंघाचे अध्यक्ष श्री. सतीश शुक्ला यांना आश्रमातील ध्यानमंदिरातील देवतांची माहिती सांगतांना कु. कविता निकम

१. श्री. अरविंद उमाकांत बिरादार (धारकरी – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान), धनकवडी, पुणे, महाराष्ट्र.

अ. ‘हिंदु राष्ट्राची प्रतिकृती म्हणजे सनातन आश्रम होय. मी आश्रमात १ घंटा असतांना ‘मी पृथ्वीतलावर नसून वैकुंठलोकी आहे’, असे मला जाणवले.’

डावीकडून पाटण, सातारा येथील श्री धारेश्वर मठाचे मठाधिकारी १०८ श्री नीळकंठ शिवाचार्य स्वामी यांना सूक्ष्म जगताविषयी माहिती सांगतांना श्री. रोहित साळुंके

२. श्री. राहुल शंकरराव पोतदार (व्यावसायिक), हुपरी, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर, महाराष्ट्र.

अ. ‘प्रत्येक साधक करत असलेली सेवा आणि त्याच्यातील आत्मीयता पाहून चांगले वाटले. ‘त्यांच्याकडून पुष्कळ शिकण्यासारखे आहे’, असे मला वाटले.’

३. श्री. प्रसाद गुरव (मुख्य पुरोहित, श्री श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान), वीर, जिल्हा पुणे.

अ. ‘आश्रम पाहून ‘प्रत्येक गोष्टीत ईश्वरी शक्ती शोधण्याचा आपला प्रयत्न यशस्वी झाला आहे’, असे मला वाटले. मला येथील वास्तू देवस्वरूप आणि व्यक्ती संतस्वरूप भासल्या.’

डावीकडून बेंगळुरू, कर्नाटक येथील राष्ट्रीय हिंदु परिषदेचे उपाध्यक्ष श्री. सुरेश गौडा आणि कन्नड चित्रपटांतील अभिनेते श्री. सुचेंद्र प्रसाद यांना ‘सनातन प्रभात’विषयी माहिती सांगतांना श्रीमती अश्विनी प्रभु

४. सौ. स्वाती पांडेय, प्रभादेवी, मुंबई, महाराष्ट्र.

अ. ‘मी आश्रम पाहून निःशब्द झाले.

आ. मी अशा सात्त्विक वातावरणात प्रथमच आले आहे. मला आश्रमात सात्त्विक ऊर्जेचा लाभ मिळाला.

इ. ‘असा आश्रम प्रत्येक राज्यात आणि प्रांतात व्हावा’, अशी देवाला प्रार्थना आहे.’

५. श्री. मोहन भैरवकर (मुख्य पुरोहित आणि विश्वस्त, श्री भैरवनाथ मंदिर देवस्थान), सासवड, पुणे.

अ. ‘आध्यात्मिक ऊर्जा आणि त्याचा लाभ नवीन पिढीला देण्याची जिज्ञासा माझ्यात निर्माण झाली. आश्रमातील चैतन्यामुळे नवीन पिढीला ज्ञान, भक्ती आणि श्रद्धा वृद्धींगत करण्यासाठी चालना मिळाली.’

(‘श्री. मोहन भैरवकर आश्रम पहात असतांना त्यांना ‘प्रत्येक ठिकाणी देवकार्य होत आहे’, असे वाटत होते. त्यामुळे त्यांची भावजागृती होत होती.’ – संकलक)

६. श्री. दिलीप हिवरेकर (विश्वस्त, श्री भैरवनाथ मंदिर देवस्थान), हिवरे, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे.

अ. ‘आश्रम पाहून मला स्वतःत सकारात्मक ऊर्जा निर्माण झाल्याचे जाणवले आणि मनाला आनंद झाला.’

(सर्व सूत्रांचा दिनांक : २५.६.२०२४)