‘सत्तावन्नच्या स्वातंत्र्यसमरातील अग्नीकल्लोळाची ही शेवटची ज्वाला…

रणलक्ष्मी लक्ष्मीराणी कृतकीर्ति, कृतप्रतिज्ञ, कृतकृत्य झाली ! ‘लक्ष्मीराणी आमची आहे’, हे म्हणण्याचा मान मिळणे परम दुष्कर आहे. ‘लक्ष्मीच्या अंगात जे रक्त खेळत होते, ते रक्त, ते बीज, ते तेज आमचे आहे’, अशी यथार्थ गर्वोक्ती करण्याचे भाग्य हे भारतभू, तुझे आहे !’

स्वातंत्र्यवीर सावरकर हा सूर्य कधी मावळला नाही, तो कधी मावळणारही नाही ! – शरद पोंक्षे, ज्येष्ठ अभिनेते

स्वातंत्र्यानंतर अनुमाने ५० वर्षांहून अधिक काळ काँग्रेसची ‘गल्ली ते दिल्ली’ सत्ता होती. या काळात शक्य त्या मार्गाने स्वातंत्र्यवीर सावरकरांची अपकीर्ती करण्याचा प्रयत्न केला गेला; परंतु स्वा. सावरकर हा सूर्य कधी मावळला नाही, तो कधी मावळणारही नाही,…

स्वातंत्र्यवीर सावरकर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘ऑनलाईन’ प्रबोधन

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या दिनांकानुसार जयंतीच्या निमित्ताने ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे सर्व पैलू समाजासमोर जाणीवपूर्वक येऊ दिले नाहीत ! – सुनील देवधर, राष्ट्रीय सचिव, भाजप

श्री. देवधर पुढे म्हणाले, ‘‘सावरकरांनी मांडलेल्या हिंदुत्वाच्या विचारांवरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना हिंदुत्वाची शक्ती मिळाली. सावरकरांचेच कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ करत आहेत.’

अमरावती येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याची स्वच्छता आणि अभिवादन !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या दिनांकानुसार असणाऱ्या जयंतीनिमित्त शहरातील सातुर्णा परिसरातील ‘गुरुकुल’ या क्रीडा सभागृहाच्या प्रांगणात असलेल्या पुतळ्याची हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी संघटना यांच्या वतीने स्वच्छता करण्यात आली. पूजन आणि पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

दुकानावर ‘भगवे स्टीकर’ असणार्‍या व्यापार्‍यांकडूनच वस्तू खरेदी करणार ! – सावरकर जयंतीला हिंदु महासंघाची पुणे येथे शपथ

‘मी माझ्या कुटुंबासाठी लागणार्‍या सर्व जीवनावश्यक वस्तू हिंदु धर्माचा आदर करणार्‍या बांधवांकडूनच घेईन’, अशी शपथ सावरकर जयंतीच्या निमित्ताने हिंदु महासंघाच्या कार्यकर्त्यांनी २८ मे या दिवशी पुणे येथे घेतली.

काँग्रेसने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे ऐकले असते, तर देशाची फाळणी झाली नसती ! – योगी आदित्यनाथ

विनायक दामोदर सावरकर यांच्यासारखे क्रांतीकारक, लेखक, तत्त्वज्ञ आणि कवी यांचा अपमान करण्याची काँग्रेसने कोणतीही संधी सोडली नाही. स्वातंत्र्यापूर्वी इंग्रजांनी आणि स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने राष्ट्रनायक सावरकर यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे काही परदेशी चाहते, साहाय्यक आणि समर्थक !

सावरकरांवर टीका करणारे साम्यवादी आणि सावरकरद्वेषी त्यांना साहाय्य करणाऱ्या विदेशी समर्थकांचा भाग जाणून घेतील का ?

नाटककार स्वातंत्र्यवीर सावरकर !

साहित्याच्या सर्वच प्रांतात साहित्य निर्मिती करणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी केवळ तीनच नाटके लिहून मराठी नाट्यसृष्टी समृद्ध आणि संपन्न केली आहे. सावरकर यांच्या नाटकांचे विषय हृदयाला सतत जाळणारे, मस्तकाला सतत चिंतनाचे खाद्य पुरवणारे आणि कृतीप्रवण करणारे आहेत.

नेहरू यांनी ब्रिटिशांचे ‘बी टीम’ म्हणून काम केले ! – आमदार अतुल भातखळकर, भाजप

चीनच्या आक्रमणाच्या वेळी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी अमेरिकेकडून विमाने आणि पायलटही मागवले. यावरून नेहरू यांची देशाच्या संरक्षणाविषयीची आस्था (?) दिसून येते. नेहरू यांनी ब्रिटिशांची ‘बी टीम’ म्हणून काम केले, असे गंभीर वक्तव्य भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केले.