‘सत्तावन्नच्या स्वातंत्र्यसमरातील अग्नीकल्लोळाची ही शेवटची ज्वाला… रणलक्ष्मी लक्ष्मीराणी कृतकीर्ति, कृतप्रतिज्ञ, कृतकृत्य झाली ! ‘लक्ष्मीराणी आमची आहे’, हे म्हणण्याचा मान मिळणे परम दुष्कर आहे. ‘लक्ष्मीच्या अंगात जे रक्त खेळत होते, ते रक्त, ते बीज, ते तेज आमचे आहे’, अशी यथार्थ गर्वोक्ती करण्याचे भाग्य हे भारतभू, तुझे आहे !’
– स्वातंत्र्यवीर सावरकर (साभार : ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’)