दुकानावर ‘भगवे स्टीकर’ असणार्‍या व्यापार्‍यांकडूनच वस्तू खरेदी करणार ! – सावरकर जयंतीला हिंदु महासंघाची पुणे येथे शपथ

पुणे – ‘मी माझ्या कुटुंबासाठी लागणार्‍या सर्व जीवनावश्यक वस्तू हिंदु धर्माचा आदर करणार्‍या बांधवांकडूनच घेईन’, अशी शपथ सावरकर जयंतीच्या निमित्ताने हिंदु महासंघाच्या कार्यकर्त्यांनी २८ मे या दिवशी पुणे येथे घेतली, तसेच इतर लोकांनीही केवळ हिंदु धर्माचा सन्मान असणार्‍या व्यावसायिकांकडूनच वस्तू खरेदी कराव्यात, असे आवाहनही हिंदु महासंघाकडून करण्यात आले. त्यासाठी हिंदु महासंघाकडून संबंधित व्यापार्‍यांच्या दुकानावर भगव्या रंगाचे ‘स्टीकर’ लावले जाईल. यामुळे हिंदु धर्माचा सन्मान करणार्‍या व्यापार्‍यांची दुकाने ओळखणे सोपे जाईल.

(सौजन्य : Zee 24 Taas)

सावरकर जयंतीनिमित्त पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे वास्तव्य असलेली खोलीही उघडण्यात आली होती. पुण्यातील सावकरप्रेमी येथे सावरकरांना अभिवादन करण्यासाठी जमतात.