नवी देहली – अल् कायदा या आतंकवादी संघटनेची साहाय्यक आणि अफगाणिस्तानमध्ये सक्रीय असणारी ‘अल् कायदा इन इंडियन सबकाँटिनेंट’ (‘एक्यूआयएस्’ – भारतीय उपमहाद्वीपामध्ये अल् कायदा) ही आतंकवादी संघटना भारतात घातपात करण्याच्या सिद्धदेत आहे, असे संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात म्हटले आहे.
The report further said that the Tehrik-e Taliban Pakistan (TTP) constitutes the largest component of foreign terrorist fighters in #Afghanistanhttps://t.co/vSbF1GFeor
— The Hindu (@the_hindu) May 30, 2022
१. ‘एक्यूआयएस्’ने तिच्या ‘नवा-ए-अफगान जिहाद’ या नितकालिकाचे नाव मार्च २०२२ मध्ये ‘नवा-ए-गजवा-ए-हिंद’ (भारताचा विनाश) असे केले आहे. यातून ही संघटना भारतात आतंकवादी घातपात करण्याच्या सिद्धतेत असल्याचे संकेत मिळत आहेत, असे या अहवालात म्हटले आहे.
२. ‘एक्यूआयएस्’ अत्यंत शांततेत आतंकवादी कारवाया करत आहे. या संघटनेकडे सध्या १८० ते ४०० आतंकवादी आहेत. यात पाकिस्तान, भारत, बांगलादेश आणि म्यानमार येथील मुसलमान नागरिकांचा समावेश आहे. ही आतंकवादी संघटना अफगाणिस्तानमधील गझनी, हेलमंद, कंधार, निमरुज, पकतिका आणि जबुल राज्यांमध्ये कार्यरत आहे.
३. वर्ष २०१९ मध्ये अल् कायदाचा प्रमुख अल् जवाहिरी याने काश्मीरमध्ये जिहाद करण्याविषयी प्रक्षोभक भाषण केले होते. याचा उल्लेख ‘एक्यूआयएस्’ संघटना नेहमीच करत असते.
संपादकीय भूमिकाजिहादी आतंकवाद्यांना धर्म असल्याने ते हिंदूंच्या भारतावर सातत्याने आक्रमण करण्याच्या सिद्धेतत असतात, हेच पुनःपुन्हा सिद्ध येते ! |