‘आयुष’ मंत्रालयांतर्गत येणार्‍या औषधांना प्रोत्साहन दिल्याने अ‍ॅलोपॅथीवर  परिणाम होत असल्याचा गोव्यातील डॉक्टरांचा दावा !

केंद्रशासनाने ‘आयुष’ मंत्रालयांतर्गत येणार्‍या औषधांना प्रोत्साहन देण्यासाठी चालवलेल्या प्रयत्नांना गोव्यातील डॉक्टरांनी विरोध दर्शवला आहे. केंद्राच्या या प्रयत्नांचा निषेध करणारे एक निवेदन ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’च्या गोवा विभागाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना दिले आहे.

सैनिकांच्या कल्याणासाठी ध्वजदिन निधी संकलनात सहभागी व्हा ! – मंगेश जोशी, प्रभारी जिल्हाधिकारी

देशाच्या रक्षणार्थ अनेक सैनिकांनी त्यांचे प्राण पणाला लावून देशाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवले आहे. काहींनी स्वत:च्या प्राणांची आहुतीही दिली आहे. सैनिकांप्रती कृतज्ञता म्हणून त्यांच्या कल्याणासाठी प्रत्येकाने ध्वजनिधी संकलनात सहभागी व्हावे, असे आवाहन मंगेश जोशी यांनी केले.

हॉटेल व्यावसायिकाकडून स्थानिकांना वागातोर समुद्रकिनार्‍यावर मज्जाव

वागातोर येथील एका हॉटेल व्यावसायिकाने वागातोर समुद्रकिनार्‍याचे नाव ‘सनबर्न बीच’ असे ठेवण्यासमवेतच या समुद्रकिनार्‍यावर अंजुना, कायसुव आणि वागातोर येथील स्थानिक नागरिकांना प्रवेश नाकारला आहे.

काश्मीरमध्ये २ आतंकवादी ठार

पुलवामा (जम्मू-काश्मीर) येथे ९ डिसेंबरला पहाटे सुरक्षादल आणि आतंकवादी यांच्यात झालेल्या चकमकीमध्ये २ आतंकवाद्यांना ठार करण्यात आले.

झेवियरच्या शवपेटीच्या दुरुस्तीसाठी बासिलिका चर्च बंद रहाणार

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण १० डिसेंबरपासून झेवियरच्या शवाचे अवशेष असलेल्या शवपेटीच्या पुनर्रचनेचे काम करणार असल्याने बासिलिका ऑफ बॉम जिझस हे चर्च पर्यटक आणि तेथे भेट देणार्‍यांसाठी त्या दिवशी सकाळी ८ वाजताच्या प्रार्थनेनंतर बंद असेल

जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी कोरोनाबाधित रुग्णांना ‘पीपीई किट’ घालून मतदान करावे लागेल

१२ डिसेंबर या दिवशी होणार्‍या जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी कोरोनाबाधित रुग्णांना दुपारी ४ ते सायंकाळी ५ या वेळेत ‘पीपीई किट’ घालून मतदान करावे लागणार आहे. शासनाने कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर जि.पं. निवडणुकीसाठी नियमावली ९ डिसेंबर या दिवशी प्रसिद्ध केली आहे.

गोव्यातील राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प जून २०२१ पर्यंत पूर्ण होणार

गोव्यातील सर्व राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प जून २०२१ पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ता वाहतूक आणि महामार्ग खात्याचे अधिकारी पांडे यांनी चालू असलेल्या कामांची पहाणी केल्यानंतर दिली.

मुख्यमंत्र्यांविषयी आक्षेपार्ह ‘ट्वीट’ केल्याप्रकरणी लोकशाही असलेल्या अन्य देशांत काय कारवाई होते ? याची माहिती द्या !

लोकशाही असलेल्या अन्य देशांत तेथील नागरिकांनी सामाजिक प्रसारमाध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट किंवा ‘ट्वीट’ केले, तर तेथे काय कारवाई करण्यात येते ? याची माहिती द्या, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्यशासनाला दिले आहेत.

लालबाग सिलिंडर स्फोटप्रकरणी पिता-पुत्रावर मनुष्यवधाचा गुन्हा नोंद

लालबाग येथील सिलिंडरच्या स्फोटप्रकरणी मंगेश राणे आणि त्यांचा मुलगा यश यांच्या विरोधात काळाचौकी पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद केला आहे.

‘भारत बंद’चा गोव्यावर परिणाम नाही

‘भारत बंद’ला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, गोवा फॉरवर्ड पक्ष, आप आणि शिवसेना या राजकीय पक्षांनी, तसेच शेतकरी संघ, ‘अखिल भारतीय किसान सभा’, ‘सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन’ आदींनी पाठिंबा दर्शवला होता आणि लोकांनी स्वयंस्फूर्तीने ‘बंद’मध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते