
सिंधुदुर्ग – कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण राज्यात रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत आहे. त्यासाठी अधिकाधिक तरुणांनी रक्तदान करण्यासाठी पुढे येणे काळाची आवश्यकता असल्याचे युवा रक्तदाता संघटनेने म्हटले आहे.
कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी ‘प्लाझ्मा’ देण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. याची कोणत्याही क्षणी आवश्यकता भासत आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्या बर्याच रुग्णांसाठी ‘प्लाझ्मा’ देणारे शोधणे कठीण जात आहे. मुंबई, तसेच बांबोळी (गोवा) येथे ‘प्लाझ्मा’ देणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पाठवावे लागत आहेत. अशा कठीण प्रसंगी सर्व रक्तगटांच्या युवा रक्तदात्यांनी रक्तदानासाठी कायम कटीबद्ध रहात ‘रक्तदाता संघटना’ आणि संस्था यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो म्हणून रक्तदान, प्लाझ्मा दान करून आपले कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी केले आहे.
‘श्री मोरया गोसावी मंदिर’ परिसरातील विक्रेत्यांवर कायमस्वरूपी कारवाई करावी !
पुणे येथील ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’मधील वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून अभियंत्याची आत्महत्या !
झाडांच्या संवर्धनात निष्काळजीपणा केल्यास भावी पिढीसाठी पुष्कळ रुग्णालये बांधावी लागतील !
सांगलीसह राज्यातील १२ बाजार समित्यांना ‘राष्ट्रीय बाजारपेठे’चा दर्जा !
शहरी आणि ग्रामीण भागांतील युवकांचे प्रश्न सोडवले जातील ! – अभिजित दीपके, कॉकरोच जनता पक्ष
वीजदेयकांविषयीचा प्रश्न सुटेपर्यंत स्मार्टमीटर बसवणे स्थगित ! – मुख्यमंत्री प्रमोद सावंत