आता मुंडे यांचे त्यागपत्र घ्या ! – चंद्रकांत पाटील, भाजप

उद्धव ठाकरे यांनी जे केले तेच शरद पवार यांनी करत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे त्यागपत्र घ्यावे, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

काँग्रेस आहे म्हणून सरकार आहे, हे लक्षात असू द्या ! – नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

खादी गोष्ट अल्प दिली जात असेल, तर त्यावर बोलल्यास ते चूक म्हणता येणार नाही. केवळ समान वाटप व्हावे, इतकीच आमची अपेक्षा आहे. काँग्रेस आहे म्हणून सरकार आहे, हे लक्षात असू द्या.

बलात्कार्‍याला हाकलून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा ! – चित्रा वाघ यांचा घणाघात

आम्ही विरोधी पक्षात असलो, तरी आम्हाला तुमच्याविषयी आदर आहे. २१ दिवस झाले, तरी पूजा चव्हाण आत्महत्येच्या प्रकरणात गुन्हाही नोंदवण्यात आलेला नाही. मुख्यमंत्रीसाहेब, खरंच खुर्ची एवढी वाईट आहे का ? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसते, तर राठोड यांना फाडून काढले असते……

वनमंत्री संजय राठोड यांच्यावर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वी कारवाई न झाल्यास सभागृह चालू देणार नाही ! – चंद्रकांत पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष

मुख्यमंत्र्यांनी याविषयी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी निवेदन करावे, अन्यथा आम्ही या सूत्रावर तोंड न उघडणार्‍या राज्य सरकारला अधिवेशनात तोंड उघडू देणार नाही, तसेच सभागृह चालू देणार नाही, अशी चेतावणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

रूपी बँकेच्या पुनरुज्जीवनासाठी रिझर्व्ह बँकेला प्रस्ताव सादर ! – सुधीर पंडित, रूपी बँक प्रशासक

रूपी बँक आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक यांनी सहकार विभागाच्या वतीने विलिनीकरणाचा संयुक्त फेर प्रस्ताव रिझर्व्ह बँकेकडे २४ नोव्हेंबर २०२० या दिवशी दिला आहे.

वीजदेयक वसुलीसाठी कृषी पंपांची वीज तोडली

पारनेर (जिल्हा नगर) तालुक्यातील संतप्त शेतकर्‍यांनी गाठले वीज आस्थापनाचे कार्यालय

‘अहमदनगर’चे नामांतर ‘पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर’ करा !

राज्यात सध्या औरंगाबाद नामांतरणाचे सूत्र ऐरणीवर असतांना अहमदनगरचे नामांतर करून शहराला ‘पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर’ असे नाव देण्याची मागणी होळकर घराण्याचे वंशज भूषणसिंह होळकर यांनी केली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी ब्राह्मण समाजाची दिशाभूल करू नये ! – शिवसेनेचा पत्रकाच्या माध्यमातून आरोप 

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ब्राह्मण समाजास गृहीत धरून त्यांची दिशाभूल करू नये.

विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा उपयोग आत्मनिर्भरतेसाठी करावा ! – भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल

जीवनात यशस्वी होण्यासाठी उच्च ध्येय, मेहनत, कष्ट, त्याग, इच्छाशक्ती अंगी बाणवून ध्येय पूर्ण करण्याचा संकल्प जोपासावा, असे मार्गदर्शन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

शिवरायांच्या राज्यशैलीचे अनुकरण केल्यास भारत महासत्ता बनेल ! – छत्रपती उदयनराजे भोसले

युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज एकमेवाद्वितीय राजे होते. शिवरायांच्या राज्यशैलीचे अनुकरण केल्यास भारत महासत्ता बनेल, असे प्रतिपादन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केले.