सामाजिक माध्यमांद्वारे महिलांच्या छेडछाड प्रकरणी पुणे ‘सायबर सेल’कडे २०२ तक्रारींची नोंद !

‘सायबर सेल’चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. संजय तुंगार यांनी सांगितले, सामाजिक माध्यमावर सायबर गुन्हेगारीशी संबंधित कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवल्यास महिलांनी तातडीने पोलिसांकडे तक्रार करावी. खासगी गोष्टी सामाजिक माध्यमावर पोस्ट किंवा शेअर करू नयेत.

ट्विटरकडून विनय प्रकाश यांची तक्रार निवारण अधिकारी म्हणून नियुक्ती

ट्विटरने केंद्रशासनाने नव्याने लागू केलेल्या माहिती आणि तंत्रज्ञान यांच्या संदर्भातील नियम प्रारंभी मान्य केले नव्हते. याविषयी देहली उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आल्यावर ट्विटरने ते मान्य करण्याची संमती दर्शवली होती.

WhatsApp च्या गोपनीयतेच्या धोरणावर आम्ही सध्या स्वेच्छेने बंदी घातली आहे ! – WhatsApp ची देहली उच्च न्यायालयात माहिती

यातून व्हॉट्सअ‍ॅपचा उद्दामपणा दिसून येतो ! ‘व्हॉट्सअ‍ॅपच्या गोपनीयतेच्या धोरणावर सरकारने आक्षेप घेतला असून तो आम्ही परेच्छेने तात्पुरता मान्य करत आहोत’, असेच या आस्थापनाला यातून सुचवायचे आहे !

ट्विटरने कायद्याचे पालन न केल्याने सरकार कारवाई करू शकते ! – देहली उच्च न्यायालय

देहली उच्च न्यायालयात ट्विटरने मान्य केले की, त्याने माहिती आणि तंत्रज्ञान कायद्याचे पालन केले नाही. यावर न्यायालयाने स्पष्ट केले की, आता आम्ही ट्विटरला कोणतेही संरक्षण देऊ शकत नाही.

भारतीय मानचित्रातून जम्मू-काश्मीर आणि लडाख यांना वगळणार्‍या ट्विटरच्या विरोधात गुन्हा नोंद

पोलिसांनी केवळ गुन्हा नोंद करून गप्प राहू नये, तर संबंधितांना अटक करून कारागृहात डांबले पाहिजे !

ट्विटरने भारताच्या मानचित्रातून जम्मू-काश्मीर आणि लडाख यांना वगळले !

विदेशी सामाजिक माध्यम असलेल्या ट्विटरचा वाढता उद्दामपणा रोखण्यासाठी आता भारतात त्याच्यावर बंदीच घातली पाहिजे !

हिंदुविरोधी प्रसिद्धीमाध्यमांच्या षड्यंत्राच्या विरोधात धर्माभिमान्यांचा #Hinduphobic_Media हा ट्विटर ट्रेंड !

तो राष्ट्रीय ट्रेंडमध्ये ५ व्या क्रमांकावर होता. त्यावर ३६ सहस्रांहून अधिक ट्वीट्स करण्यात आल्या.

साधकांनो, प्रत्येक क्षण साधनेसाठीच वापरून साधनेची फलनिष्पत्ती वाढवा आणि आध्यात्मिक उन्नतीचे ध्येय शीघ्र साध्य करा !

एकदा गेलेला वेळ पुन्हा मिळवता येत नाही’, या तत्त्वानुसार साधकांनी एकही क्षण न दवडता साधनेसाठी झोकून देऊन प्रयत्न करणे अपेक्षित आहे.

मडिकेरी (कर्नाटक) येथे फेसबूकवर युवतीच्या नावाने एका महिलेला अश्‍लील संदेश पाठवणार्‍या धर्मांधाला चोपले !

त्याच्या चौकशीत या कृत्यात त्याचे आणखी दोन सहकारी सहभागी असल्याची माहिती मिळाली आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

संभाजीनगर येथे भ्रमणभाषवरील ‘गेम’ खेळून मुलाने व्यय केले २८ सहस्र रुपये !

शाळेतील ‘ऑनलाईन’ वर्ग झाल्यानंतर पालकांनी मुलांना आध्यात्मिक, सांस्कृतिक या गोष्टींसह संगीत शिकणे, संस्कृत वर्ग, योगाभ्यास अशा गोष्टींची गोडी लागण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.