भारतीय मानचित्रातून जम्मू-काश्मीर आणि लडाख यांना वगळणार्‍या ट्विटरच्या विरोधात गुन्हा नोंद

पोलिसांनी केवळ गुन्हा नोंद करून गप्प राहू नये, तर संबंधितांना अटक करून कारागृहात डांबले पाहिजे !

ट्विटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनीष माहेश्‍वरी

बुलंदशहर (उत्तरप्रदेश) – भारताच्या मानचित्रातून जम्मू-काश्मीर आणि लडाख यांना वगळणार्‍या ट्विटरच्या विरोधात येथे बजरंग दलाच्या नेत्याने पोलिसांत तक्रार केल्यानंतर ट्विटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनीष माहेश्‍वरी यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. भा.दं.वि. कलम ५०५ (२) आणि माहिती तंत्रज्ञान (संशोधन) अधिनियम २००८ च्या कलम ७४ अंतर्गत हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. भारतियांच्या विरोधानंतर सध्या ट्विटरने हे मानचित्र हटवले आहे.