ट्विटरने भारताच्या मानचित्रातून जम्मू-काश्मीर आणि लडाख यांना वगळले !

विदेशी सामाजिक माध्यम असलेल्या ट्विटरचा वाढता उद्दामपणा रोखण्यासाठी आता भारतात त्याच्यावर बंदीच घातली पाहिजे !

ट्विटरने भारताच्या मानचित्रातून जम्मू-काश्मीर आणि लडाख यांना वगळले

( या चित्राच्या माध्यमातून कुणाच्याही राष्ट्रीय भावना दुखावण्याचा हेतु नसून भारताच्या मानचित्रात कशी चूक केली आहे, ते कळावे, यासाठी दिले आहे. )

नवी देहली – ट्विटरच्या ‘ट्वीप लाईफ’ या ‘करियर’संबंधी भागामध्ये दाखवण्यात आलेल्या जगाच्या मानचित्रामधील भारताच्या मानचित्रामध्ये जम्मू-काश्मीर आणि लडाख हा भाग दाखवलेला नाही. यानंतर सामाजिक माध्यमांतून याचा विरोध होत आहे. ट्विटरने यापूर्वी अशा प्रकारचे कृत्य केले होते आणि त्याचा विरोध करण्यात आला होता. यापूर्वी ट्विटरने लेह येथील भौगोलिक ठिकाण दाखवतांना जम्मू-काश्मीरला चीनमध्ये दाखवले होते.