हिंदुविरोधी प्रसिद्धीमाध्यमांच्या षड्यंत्राच्या विरोधात धर्माभिमान्यांचा #Hinduphobic_Media हा ट्विटर ट्रेंड !

राष्ट्रीय स्तरावर ५ व्या स्थानी !

मुंबई – गेल्या काही मासांपासून ‘फेसबूक’कडून हिंदुत्वनिष्ठ आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांची पाने त्यांना कोणतीही कल्पना न देता बंद करण्यात आली आहेत. यानंतर काही हिंदुद्वेषी प्रसिद्धीमाध्यमांनी, उदा.‘टाइम’ नियतकालिक, तसेच ‘द वायर’ आणि ‘द मीडियम’ या वृत्तसंकेतस्थळांद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या लेखांमध्ये सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती, सनातन प्रभात आदींना हिंसाचारी अन् आतंकवादी दाखवण्याचा प्रयत्न करून त्यांची अपकीर्ती करण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्यात आला. ‘टाइम’ नियतकालिकाने पाठवलेल्या अहवालानंतरच फेसबूकने काही हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या पानांवर बंदी घातली. प्रसिद्धीमाध्यमे आणि फेसबूक यांच्याकडून संघटितपणे एका षड्यंत्राद्वारे हिंदूंचे दमन करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. या षड्यंत्राच्या विरोधात हिंदु धर्माभिमान्यांकडून २७ जून या दिवशी  #Hinduphobic_Media नावाने हॅशटॅग ट्रेंड करण्यात आला होता. तो राष्ट्रीय ट्रेंडमध्ये ५ व्या क्रमांकावर होता. त्यावर ३६ सहस्रांहून अधिक ट्वीट्स करण्यात आल्या.