श्रीरामललाच्या मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त देवबाग (जिल्हा सिंधुदुर्ग) येथे शोभायात्रा !

पुष्पक विमानाच्या चित्ररथावर श्रीराम, लक्ष्मण, सीता, गरुड आणि हनुमंत या व्यक्तिरेखा साकारण्यात आल्या होत्या. देवबाग येथील श्री विठ्ठल मंदिर येथे शोभायात्रा आल्यावर महिला ढोल पथकाच्या तालावर यात्रेतील महिलांनी भगव्या पताका उंचावत फेर धरून नृत्य केले.

सिंधुदुर्ग : बगलमार्गावरील दुभाजक फोडणार्‍यांवर कारवाई न झाल्यास उपोषण करणार ! – रवींद्र केरकर, उपसरपंच, इन्सुली

हे प्रशासनाला का समजत नाही ? अशी चेतावणी का द्यावी लागते ?

सिंधुदुर्ग : मार्गावर सुरक्षारक्षक न नेमल्यास खनिज वाहतूक रोखणार ! – हेमंत मराठे, उपसरपंच, मळेवाड-कोंडुरे ग्रामपंचायत

खनिज वाहतूक करतांना सुरक्षारक्षक नेमण्याच्या जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाची पायमल्ली केली जात आहे, तर याकडे खाण अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे अपघात होऊन जीवित आणि वित्त हानी होण्याची दाट शक्यता आहे.

Hydro Power Project Sindhudurg : कुडाळ तालुक्यात आंजिवडे गावात अदानी आस्थापनाचा हायड्रो वीजनिर्मिती प्रकल्प होण्याची शक्यता

‘एवढा मोठा प्रकल्प येथे प्रस्तावित असतांना आणि त्यासाठी कार्यवाहीही चालू असतांना एवढी गुप्तता पाळण्याची आवश्यकता काय ?’, असा प्रश्‍न आता निर्माण होत आहे.

New Year Celebration : पाश्‍चिमात्य संस्कृतीनुसार नवीन वर्ष साजरे न करण्याविषयी राज्यस्तरीय प्रबोधन स्पर्धेचे आयोजन

नवीन वर्ष साजरे करण्याच्या प्रचलित पद्धतीत पालट होण्यासाठी ‘महायुवा सोशल रीलस्टार’ ही स्पर्धा २९ डिसेंबर २०२३ ते १२ जानेवारी २०२४ पर्यंत असणार आहे.

Water Issue Goa : तिलारी धरणातून गोव्याच्या बाजूने पाणीपुरवठ्याला प्रारंभ

तांत्रिक गोष्टींमुळे महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी धरणातून पाणी सोडण्यास येणारी अडचण दूर होऊन आज, २७ डिसेंबरला धरणातून गोव्याच्या बाजूने पाणीपुरवठ्यास प्रारंभ झाला.

Threat To Journalist : कणकवली (सिंधुदुर्ग) उपजिल्हा रुग्णालयाच्या स्त्रीरोग तज्ञ डॉ. अर्पिता आचरेकर यांनी कारवाईच्या भीतीने दिले त्यागपत्र !

डॉ. आचरेकर यांच्याविषयी प्रशासनाकडे तक्रार केली होती. या पार्श्‍वभूमीवर कारवाई होण्याच्या भीतीने डॉ. आचरेकर यांनी त्यांच्या पदाचे त्यागपत्र दिल्याचे समजते.

CAG Report : आडाळी (सिंधुदुर्ग) औद्योगिक क्षेत्राचे ७/१२ वरील क्षेत्र आणि प्रत्यक्ष नोंदी यात मोठी तफावत !

अहवालात ‘कॅग’ने स्पष्टपणे नमूद केले आहे की, प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे सार्वजनिक निधीची (तिजोरीची) हानी झाली आहे.

Angnewadi Jatrotsav : आंगणेवाडी येथील श्री भराडीदेवीचा २ मार्च या दिवशी जत्रोत्सव !

आंगणेवाडी जत्रा कोणत्याही तिथीवर अवलंबून नसते. प्रथेनुसार देवीचा कौल घेऊन जत्रेचा दिवस ठरवण्यात येतो. त्यानुसार २६ डिसेंबर या दिवशी सकाळी देवीने दिलेल्या कौलानुसार २ मार्च २०२४ हा दिवस जत्रोत्सवासाठी ठरवण्यात आला आहे.

दोडामार्ग (सिंधुदुर्ग) तालुक्यात हत्तीमुळे लाखो रुपयांची हानी : ५ हत्तींचा कळपही पडला दृष्टीस !

अन्नाच्या शोधात हत्ती शेती आणि बागायती यांची हानी करत असून आता ते थेट लोकवस्तीत येऊ लागल्याने शेतकरी अन् ग्रामस्थ यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक वर्षे हत्तींची समस्या न सुटणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !