Bulldozer Action In Sindhudurg : ग्रामस्थांच्या २१ दिवसांच्या आंदोलनानंतर आंबोली येथील अवैध बांधकामे भुईसपाट !

अवैध बांधकामांना उत्तरदायी असणार्‍यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक ! कारवाईला आलेला खर्चही बांधकाम होऊ देणार्‍या संबंधित प्रशासकीय अधिकार्‍यांकडून वसूल करावा !

Bangladeshi Infiltrators In Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पकडण्यात आलेल्या १० बांगलादेशी नागरिकांना पोलीस कोठडी

देशात अवैधरित्या वास्तव्य करणार्‍यांविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्याकरता केंद्रशासन, राज्यशासन, तसेच पोलीस महासंचालक या कार्यालयांकडून वेळोवेळी सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार कार्यवाही चालू करण्यात आली होती.

आज माणगांव (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील श्री दत्तमंदिरात ‘महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशन’

मंदिरांच्या प्राचीन प्रथा-परंपरा यांचे संरक्षण आणि संवर्धन, मंदिरांचे व्यवस्थापन, पुरातन मंदिरांचे जतन, मंदिरांतील समस्या सोडवणे यांसाठी २० फेब्रुवारी या दिवशी कुडाळ तालुक्यातील माणगांव येथील श्री दत्तमंदिरात ‘महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशन’ होत आहे.

सिंधुदुर्ग : हानीभरपाई मिळण्यासाठी पूरग्रस्त विलवडेवासियांची आंदोलन करण्याची चेतावणी !

जनतेला वारंवार आंदोलन करण्यास भाग पाडणारे प्रशासन जनहितकारी कारभार काय करणार ?

सिंधुदुर्ग : विकलांग तरुणीवरील अत्याचाराच्या प्रकरणातील डॉक्टरवर कारवाईची मागणी

पीडित तरुणी संशयित आरोपीचा घरी घरकामास होती. अत्याचार झाल्यानंतर पीडित तरुणीने तिच्या कुटुंबियांना याची माहिती दिली. त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर ही घटना उघड झाली.

सिंधुदुर्ग : अरुणा धरण प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन ९ व्या दिवशीही चालू

आंदोलनाला ९ दिवस होऊनही संबंधितांकडून कोणतेही ठोस आश्‍वासन देण्यात आले नाही. त्यामुळे १० व्या दिवशी विहिरीविषयी ठोस कार्यवाही झाली नाही, तर आमरण उपोषण करण्याची चेतावणी धरणग्रस्तांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्‍यांना दिली आहे.

सिंधुदुर्ग : अरुणा धरणाचे काम प्रकल्पग्रस्तांनी रोखले

जोपर्यंत प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन केले जात नाही आणि  प्रशासनाकडून दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली जात नाही, तोपर्यंत येथे काम करू देणार नाही.

आगामी निवडणुकीत गद्दारांना पुन्हा निवडून देऊ नका ! – उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र

‘जनसंवाद यात्रे’च्या निमित्ताने माजी मुख्यमंत्री ठाकरे ४ फेब्रवारी या दिवशी जिल्हा दौर्‍यावर आले होते. मालवण येथे सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ‘शिवराजेश्वर’ मंदिरातील सिंहासनाचे लोकार्पण ठाकरे यांच्या हस्ते झाले.

हरवलेले भ्रमणभाष शोधण्यासाठी भारत सरकारचे ‘ऑनलाईन पोर्टल’ !

आतापर्यंत या पोर्टलवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात २०० तक्रारी प्राप्त झाल्या. त्यानुसार सायबर पोलीस ठाण्याकडून तांत्रिक अन्वेषण करून त्यांपैकी १०७ भ्रमणभाष शोधण्यात यश आले.

सिंधुदुर्ग : मुणगे येथील पाणीपुरवठा योजनेचे फेब्रुवारी २०२३ मध्ये चालू करायचे काम अद्याप ठप्प !

वर्षभर पूर्ण करू न शकलेले काम प्रशासन आता २ मासांत कसे पूर्ण करणार ?