वर्षभरात चंदनाची झाडे कापून नेण्याचे ३० गुन्हे नोंद !
पुणे – वरिष्ठ सैन्य अधिकार्याच्या बंगल्याच्या आवारातून चंदनाची ३ झाडे कापून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. पसार झालेल्या चंदनचोरांचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. या प्रकरणी पांडीयराज मुरुगन यांनी दिलेल्या तक्रारीवरून चंदन चोरांविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. बंगल्यात ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ नाहीत. त्यामुळे चोरांचे चित्रीकरण उपलब्ध झाले नाही. पसार झालेल्या चोरांचा पोलिसांकडून माग काढण्यात येत आहे.
शहरात गेल्या काही महिन्यांपासून चंदनचोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शासकीय, तसेच शैक्षणिक संस्थांचे आवार, बंगले, सोसायट्यांच्या आवारातून चंदनाची झाडे कापून नेण्याच्या घटना घडल्या आहेत. वर्षभरात चंदनाची झाडे कापून नेण्याचे ३० गुन्हे नोंद झाले आहेत.
संपादकीय भूमिका
|