(म्‍हणे) ‘हिंदु राष्‍ट्र झाले, तर देशात वाद-विवाद होतील !’ – डॉ. विश्‍वनाथ कराड, संस्‍थापक अध्‍यक्ष, एम्.आय.टी.

पुणे येथे ‘शिवराज्‍यभिषेक’ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा !

पुणे – हिंदु राष्‍ट्र बनवण्‍याची कल्‍पना कितीही चांगली आणि सुंदर असली, तरी ती व्‍यवहार्य नाही. हिंदु राष्‍ट्र झाले, तर या देशात अनेक वाद-विवाद होतील; म्‍हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या हिंदवी स्‍वराज्‍यासाठी शरद पवार यांनी राज्‍यातून नेतृत्‍व करावे. आता ‘हिंदु राष्‍ट्र’ म्‍हणण्‍यापेक्षा ‘हिंदवी स्‍वराज्‍य’ म्‍हटले पाहिजे, असे मत एम्.आय.टी.चे संस्‍थापक अध्‍यक्ष डॉ. विश्‍वनाथ कराड यांनी मांडले आहे. (‘भारताला हिंदु राष्‍ट्र घोषित करायला हवे’, असे सामान्‍य हिंदूंनाही वाटते; मात्र डॉ. कराड हिंदु राष्‍ट्रविरोधी वक्‍तव्‍य करून हिंदूंची दिशाभूल करत आहेत, हे लक्षात येते ! – संपादक) शिवराज्‍यभिषेकाच्‍या ३५० व्‍या वर्षानिमित्त ‘शिवराज्‍यभिषेक’ ग्रंथाचे प्रकाशन राष्‍ट्रवादी काँग्रेसचे अध्‍यक्ष शरद पवार यांच्‍या हस्‍ते पुणे येथे करण्‍यात आले. या वेळी ते बोलत होते.

डॉ. कराड पुढे म्‍हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन चरित्र पुष्‍कळ अद़्‍भुत आहे. सध्‍या देशात ‘लोकशाही अस्‍तित्‍वात रहाणार का ?’ यावर चर्चा होते. देशात सर्वधर्मीय लोक एकत्र रहातात. याला ७५ वर्षे झाली आहेत; पण आता या लोकांच्‍या मनात भीती निर्माण होत आहे की, आम्‍ही रहायचे कसे ? (लव्‍ह जिहाद, धर्मांतर, गोवंश हत्‍या, हिंदूंवरील भयावह आक्रमणे अशा अनेक समस्‍या हिंदूंना भेडसावत असतांना इतरांना भीती वाटते, हे म्‍हणजे ‘चोराच्‍या उलट्या बोंबा’ असे म्‍हणण्‍यासारखे झाले ! – संपादक )

संपादकीय भूमिका :

  • आज जगात ५७ इस्‍लामी राष्‍ट्रे आहेत. प्रत्‍येक धर्मियांची स्‍वतंत्र राष्‍ट्रे आहेत. मग असे असतांना हिंदूबहुल नागरिकांसाठी हिंदु राष्‍ट्र का नको ?
  • हिंदवी स्‍वराज्‍य स्‍थापन करण्‍यामागे छत्रपती शिवाजी महाराजांचा उद्देश हिंदु धर्मियांवरील अन्‍याय अन् अत्‍याचार यांचा प्रभावीपणे प्रतिकार करणे हा होता. हिंदु राष्‍ट्र स्‍थापन करण्‍याचा उद्देशही हाच आहे. मग हिंदवी स्‍वराज्‍य आणि हिंदु राष्‍ट्र या दोन्‍ही संकल्‍पना वेगळ्‍या कशा असतील ?