नाशिक येथील सौ. मीनाक्षी कोल्हे यांना रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात बसल्यावर आलेल्या अनुभूती

गोवा येथील सनातनचा रामनाथी आश्रम

१. ‘एकदा मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात बसले होते. तेव्हा आरती करण्यापूर्वी शंखनाद केला गेला. त्या वेळी मला सूक्ष्मातून दिसले, ‘सर्व देवता लगबगीने ध्यानमंदिरात उपस्थित झाल्या आहेत. सर्व देवता आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी आम्हा साधकांना आशीर्वाद दिला.’

२. सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींच्या छायाचित्राकडे पहातांना मला सूक्ष्मातून दिसले, ‘त्यांच्या छायाचित्रातून पांढरा प्रकाश माझ्या दिशेने येत आहे. त्या प्रकाशामुळे माझ्यावर आलेले आवरण दूर होत आहे.’ त्या वेळी मला हलकेपणा जाणवला.

३. माझ्या मनात ‘आता हिंदु राष्ट्र दूर नाही’, असा विचार आला.

४. मला सूक्ष्मातून दिसले, ‘सर्वत्र धर्मध्वज फडकत आहेत.’

– सौ. मीनाक्षी कोल्हे, नाशिक (६.७.२०२४)

रामनाथी आश्रमात झालेल्या शिबिराच्या वेळी आलेल्या अनुभूती 

सौ. मीनाक्षी कोल्हे

‘एकदा रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात शिबिर झाले. मला त्या शिबिरात सहभागी होण्याची संधी लाभली. त्या वेळी मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

१. या शिबिरात ‘हिंदु राष्ट्र’ विषयीचे सत्र चालू असतांना माझे लक्ष व्यासपिठावर मागे लावलेल्या श्रीकृष्णाच्या चित्राकडे वेधले गेले. तेव्हा मला सूक्ष्मातून दिसले, ‘श्रीकृष्णाच्या चरणांतून पांढरा प्रकाश बाहेर पडत आहे आणि तो प्रकाश व्यासपीठ अन् सभागृहात पसरला आहे.

२. समाजातील सर्व व्यक्ती हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सहभागी होण्यासाठी नावनोंदणी करत आहेत.

३. सर्व जण श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करत आहेत.’

नंतर माझ्याकडून श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.’

– सौ. मीनाक्षी कोल्हे, नाशिक, (५.७.२०२४)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील
    म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक