यवतमाळ येथील कु. कृष्णा पारधी (वय १४ वर्षे) याला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आलेल्या अनुभूती

‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आल्यानंतर कु. कृष्णा रूपेश पारधी याला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

कु. कृष्णा पारधी

१. आश्रमात सेवा करतांना थकवा न जाणवणे  

‘मी घरी असतांना आईला सेवेत साहाय्य करतो. त्या वेळी २० ते २५ मिनिटे सेवा केल्यावर मला कंटाळा येत असे; मात्र मी शाळेच्या सुटीत आश्रमात आल्यावर माझ्या क्षमतेनुसार कितीही सेवा केली, तरी मला थकवा जाणवला नाही.

२. पू. भार्गवराम प्रभु (सनातनचे पहिले बालसंत, वय ७ वर्षे) यांनी सांगितल्याप्रमाणे प्रार्थना केल्यावर सकाळी ६ वाजता जाग येणे  

मला सकाळी लवकर जाग येत नसे. एकदा आश्रमात माझी पू. भार्गवराम प्रभु (सनातनचे पहिले बालसंत, वय ७ वर्षे) यांच्याशी भेट झाली. तेव्हा मी त्यांना सांगितले, ‘‘मला सकाळी लवकर जाग येत नाही.’’ त्या वेळी ते मला म्हणाले, ‘‘तू मनापासून प्रार्थना कर.’’ मी तशी प्रार्थना केली आणि मला दुसर्‍या दिवशी सकाळी ६ वाजता जाग आली.’

– कु. कृष्णा रूपेश पारधी (वय १४ वर्षे), यवतमाळ (१८.५.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक