रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

गोवा येथील सनातनचा चैतन्यमय रामनाथी आश्रम

१. श्री. गिरीश शाह (प्रबंध विश्वस्त, समस्त महाजन एन्.जी.ओ.), मुंबई, महाराष्ट्र.

अ. ‘आश्रम हे अद्भुत ऊर्जाक्षेत्र असल्याचे जाणवले.

आ. हा आश्रम कायमस्वरूपी विश्वकल्याणाचा केंद्रबिंदू रहावा.’

२. अधिवक्ता विनीत जिंदाल (उच्च आणि सर्वाेच्च न्यायालय), देहली 

अ. ‘माझा भाव जागृत झाला.

आ. माझ्या मनात साधना करण्याची इच्छा जागृत झाली.

इ. मला ‘साधनेत यश मिळेल’, अशी आशा वाटली.’

३. अधिवक्ता कमलेश कुमार गुप्ता, गुवाहाटी, आसाम.

अ. ‘येथील सर्व साधक सकारात्मक ऊर्जेने भारलेले, शालीन, मनाने निर्मळ आणि हसतमुख आहेत. कुणाच्याही चेहर्‍यावर थकवा जाणवत नव्हता.

आ. सर्वकाही सुंदरच आहे. आश्रम पाहून मन आणि डोळे यांना शांती मिळते.’

४. श्री. संजीव चौहान (विभाग धर्मप्रसार प्रमुख, विश्व हिंदु परिषद), हरियाणा 

अ. ‘आश्रमात प्रवेश करताक्षणी शरिरात नवचैतन्य प्रवाहित झाल्याचे जाणवले.’

५. सौ. अनु गोयल, लुधियाना, पंजाब.

अ. ‘हिंदु धर्माला पुढे घेऊन जाण्यासाठी कुणी तरी समाजाला प्रेरित करत आहे’, हे जाणवून अभिमान वाटला.’

६. अधिवक्ता अनिरुद्ध यादव, नालासोपारा, महाराष्ट्र.

अ. ‘भारतीय सांस्कृतिक नृत्य आणि साधना यांचे सामर्थ्य लक्षात आले.’

७. श्री. महेश के. नायक (उद्योगपती), सपनाकट्टा, भटकळ, उत्तर कन्नडा, कर्नाटक.

अ. ‘आम्ही आश्रम प्रथमच पहात होतो; परंतु आश्रमात जेवढा वेळ होतो, तेवढा वेळ अतिशय आनंद अनुभवला.’

(सर्व सूत्रांचा दिनांक : २८.६.२०२४)