‘१.५.२०२४ ते १.६.२०२४ या कालावधीत मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवा करण्यासाठी आल्यावर मला स्वतःत जाणवलेले पालट येथे दिले आहेत.
१. घरी असतांना जाणवलेली सूत्रे
अ. ‘मी घरी असतांना माझ्याकडून व्यष्टी साधना अधूनमधून होत होती. मला व्यष्टी साधना करण्याचा कंटाळा यायचा.
आ. घरी माझी पुष्कळ चिडचिड व्हायची आणि मला इतरांचा राग यायचा.
इ. मी घरी काम करतांना आळस करायचे.
२. आश्रमात आल्यावर अनुभवलेले पालट
अ. आश्रमामध्ये आल्यावर माझी व्यष्टी साधना मनापासून होत असे.
आ. माझी चिडचिड होण्याचे आणि मला राग येण्याचे प्रमाणही न्यून झाले आहे.
इ. मला आता प्रत्येक सेवा करतांना उत्साह जाणवतो.’
– कु. गोजिरी लक्ष्मण काटगाळकर (आध्यात्मिक पातळी ५० टक्के, वय १३ वर्षे), खानापूर, बेळगाव. (३.६.२०२४)