‘२५.६.२०२४ या दिवशी नामजपादी उपाय करण्यासाठी डोळे बंद करून बसले असतांना मला मोठा समुद्र आणि त्याच्या मोठमोठ्या लाटा दिसल्या. त्यानंतर लगेच आपण ज्याप्रमाणे विजेचा दिवा चालू-बंद करतो, त्याप्रमाणे जांभळा प्रकाश मला चालू-बंद होतांना दिसत होता. नामजपाला आरंभ करण्यापूर्वी माझ्या मनात पुष्कळ विचार येत होते. ५५ मिनिटे नामजप झाल्यानंतर मला पुष्कळ छान वाटू लागले. मला पहिल्यांदाच नामजप करतांना आणि त्यानंतर छान वाटले.’
– सौ. माधवी सौरभ खटी, नागपूर (२५.६.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |