पुस्तकी ज्ञान आचरणात न आणल्यास ते व्यर्थच !
घरात बदाम आणि खारका यांची पोती भरून ठेवली, तरी ते पदार्थ जोपर्यंत हाडामांसात जाऊन रक्तात मिसळत नाहीत, तोपर्यंत त्यांचा उपयोग नाही. त्याचप्रमाणे पुस्तकी ज्ञानाचे पर्यवसान आचरणात झाले नाही तर ते व्यर्थ जाते.