विद्या ही बर्याच वेळा मनुष्याला भगवंतापासून दूर नेते. वारकरी पंथातील अडाणी लोक ‘विठ्ठल विठ्ठल’ म्हणता म्हणता भगवंताला ओळखतात; पण शहाणे लोक परमार्थाची पुस्तके वाचूनही त्याला ओळखत नाहीत. घरात बदाम आणि खारका यांची पोती भरून ठेवली, तरी ते पदार्थ जोपर्यंत हाडामांसात जाऊन रक्तात मिसळत नाहीत, तोपर्यंत त्यांचा उपयोग नाही. त्याचप्रमाणे पुस्तकी ज्ञानाचे पर्यवसान आचरणात झाले नाही तर ते व्यर्थ जाते.
– ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज
(‘पू. प्रा. के.वि. बेलसरे – आध्यात्मिक साहित्य’या फेसबुकवरून साभार)