गोपीभाव (गोपींचा श्रीकृष्णाप्रतीचा भाव)

गोपींचा श्रीकृष्णाप्रती अनन्यसाधारण भाव होता. असाच गोपीभाव सनातनच्या काही साधिकांमध्येही आहे. गोपीभावाचे दर्शन घडवणारी ही ग्रंथमालिका म्हणजे द्वापरयुगच जणू पुन्हा अवतरल्याची प्रचीती ! ही ग्रंथमालिका वाचा आणि गोपींप्रमाणे श्रीकृष्णभक्त होण्याचा प्रयत्न करा !

भक्तांनी व्यवहारात वागतांना ठेवावयाचे विविध भाव

आपल्या आवडत्या देवतेला सर्वांच्यात पहावे आणि सर्वांशी आदराने वागावे.

भक्तीचे प्रकार

‘मी भगवंताचा दास आहे, म्हणजे ‘माझे’ म्हणून जे काही आहे, ते सर्व भगवंताचे आहे’, अशी वृत्ती बनली पाहिजे. दास होण्यामध्ये लाचारी नाही. दास म्हणजे ज्ञानाचे दास्य. त्यामध्ये तेज आणि आनंद आहे.

गुरुपौर्णिमेला ११ दिवस शिल्लक

कासवी जशी केवळ दृष्टीमात्र पिल्लांचे पोषण करते, तद्वत् गुरु केवळ कृपावलोकनाने शिष्याचा उद्धार करतात. 

प.प. वासुदेवानंद सरस्वती टेंब्येस्वामी महाराज यांच्या रचनेचे वैशिष्ट्य

प.प. टेंब्येस्वामी महाराजांनी अनेक चतुर्मास नर्मदा तिरी केले. अत्यंत कठोर व्रताचरणी आणि सर्व यम-नियम पाळून तपाचरण करणार्‍या या प.प. टेंब्येस्वामी महाराजांच्या सर्व रचना या मंत्रयुक्त आहेत.

गुरुपौर्णिमेला १४ दिवस शिल्लक

गुरु स्वत:च शिष्याला प्रश्न विचारुन योग्य उत्तरांचे संकेत किंवा सूचना यांच्याद्वारे त्याच्या जीवनाला खऱ्या रस्त्याकडे वळवतात ! 

gurupournima

गुरुपौर्णिमेला १५ दिवस शिल्लक

चंद्र उगवताच चंद्रकांत मण्याला पाझर फुटतो, त्याप्रमाणे केवळ अंतःकरणातल्या दयाद्रवाने गुरु शिष्याला तारतात.   

गुरुपौर्णिमेला १६ दिवस शिल्लक

गुरु आपल्या डोळ्यांतून, शब्दांतून किंवा स्पर्शाने कृपेचा ओघ बुद्धीपुरस्सर भक्ताकडे लावतात. ही कृपा शिष्याला गुरूंच्या प्रयत्नाने दिलेली असते.