गुरुपौर्णिमेला १७ दिवस शिल्लक
गुरुप्राप्ती झाली आणि गुरुमंत्र मिळाला की, गुरुकृपेला आरंभ होतो. ती अखंड टिकवून ठेवण्यासाठी गुरूंनी सांगितलेली साधना आयुष्यभर सातत्याने करत रहाणे आवश्यक असते.
गुरुप्राप्ती झाली आणि गुरुमंत्र मिळाला की, गुरुकृपेला आरंभ होतो. ती अखंड टिकवून ठेवण्यासाठी गुरूंनी सांगितलेली साधना आयुष्यभर सातत्याने करत रहाणे आवश्यक असते.
परमात्म्यावर ज्याची पूर्ण श्रद्धा आहे, त्याचे रोग आणि आजार बरे होतात. रोगावर खात्रीचा श्रेष्ठतम उपचार म्हणजे भगवंतावरची श्रद्धा !
ज्याप्रमाणे मुलाला बोलायला शिकवतांना प्रारंभाला लहान शब्द शिकवतात, चालायला शिकवतांना हळूहळू चालवतात,तसेच गुरुही शिष्याला टप्प्याटप्प्याने हळूहळू शिकवतात.
अध्यात्मप्रसार ही गुरूंच्या निर्गुण-रूपाची सेवा आहे. ही गुरुकृपेसाठी ७० टक्के महत्त्वाची आहे, तर गुरूंच्या सगुणरूपाची सेवा ही ३० टक्के महत्त्वाची आहे. पूर्ण गुरुकृपेसाठी दोन्ही करणे आवश्यक आहे.
‘गुरु विश्वासावर आहे. आपल्या विश्वासावर गुरूंची महती अवलंबून आहे. गुरु तुमच्यापण विश्वासावर आहे. तुमच्या विश्वासातच गुरु आहे.
मुनष्य जन्म हा साधना करून ईश्वरप्राप्ती करण्यासाठी असतो. जो या उद्देशपूर्तीसाठी कार्यरत असतो, त्याला ‘साधक’ म्हणतात.
गुरु हे २४ घंटे शब्द आणि शब्दातीत अशा दोन्ही माध्यमांतून शिष्यास सतत मार्गदर्शन करत असतात. गुरु हे कोणत्याही संकटातून शिष्याला तारतात.
साधकांनी साधना करतांना उत्तरदायी साधकांना साधनेचा आढावा देण्याला पुष्कळ महत्त्व आहे. उत्तरदायी साधकांचे अनेक साधकांनी आढावा देण्याच्या संदर्भात लिहिलेले चिंतन वाचल्यानंतर लक्षात आले, ‘बहुतांश साधक साधनेचा आढावा देण्याच्या संदर्भात न्यून पडत आहेत.
ईश्वराचे मारक रूप काही शिकवण्यासाठी रागावले, तर त्याच वेळी ईश्वराचे तारक रूप म्हणजेच गुरु भक्ताला सांभाळून घेतात; परंतु गुरु म्हणजे तारक रूपच रागावले, तर त्यांची क्षमा मागण्यावाचून दुसरा मार्ग नसतो.
कृपा हा शब्द कृप् या धातूपासून तयार होतो. कृप् म्हणजे दया करणे आणि कृपा म्हणजे दया, करुणा, अनुग्रह किंवा प्रसाद. गुरुकृपेच्या माध्यमातून जीव शिवाशी जोडला जाणे, याला गुरुकृपायोग असे म्हणतात.