१. सकाम भक्ती : मूल ‘आई, आई’ म्हणत रडायला लागले की, आई द्राक्षे, बोरे, चॉकलेट इत्यादी त्याला देते. मुलाच्या हातात एखादी वस्तू पडताच मूल त्यात तल्लीन होते आणि आईला विसरून जाते. तसेच माणूस ‘भगवान, भगवान’ असा धावा करायला लागला की, भगवंत त्याच्यावर सुखाचा वर्षाव करतो आणि मग तो माणूस भगवंतालाच विसरतो.
२. दास्यभक्ती : ‘मी भगवंताचा दास आहे, म्हणजे ‘माझे’ म्हणून जे काही आहे, ते सर्व भगवंताचे आहे’, अशी वृत्ती बनली पाहिजे. दास होण्यामध्ये लाचारी नाही. दास म्हणजे ज्ञानाचे दास्य. त्यामध्ये तेज आणि आनंद आहे.
(संदर्भ : सनातननिर्मित ग्रंथ – सुगम भक्तीयोग)