भक्तांनी व्यवहारात वागतांना ठेवावयाचे विविध भाव

सद्गुरु डॉ. वसंत बाळाजी आठवले

१. समभाव

अ. आपल्या वयोगटांतील माणसांशी भाऊ किंवा बहीण यांप्रमाणे वागावे.
आ. वयाने मोठ्या असलेल्या माणसांशी त्यांच्या मुलांप्रमाणे वागावे.
इ. लहान मुलांबरोबर लहान मुलांप्रमाणे वागावे.

२. आत्मीयभाव

सर्वांविषयी आत्मीयभाव असावा, म्हणजे सर्वांवर स्वतःप्रमाणेच प्रेम करावे.

३. देवताभाव

आपल्या आवडत्या देवतेला सर्वांच्यात पहावे आणि सर्वांशी आदराने वागावे.

४. ईश्‍वरी भाव

भक्ताला सर्व प्राणिमात्रात आणि वस्तूतही ईश्‍वराची अनुभूती होते. त्यामुळे तो त्या तऱ्हेने वागतो.

– (सद्गुरु) डॉ. वसंत बाळाजी आठवले (वर्ष १९९०)