सतत इतरांमधील दोषच पाहून बहिर्मुख होऊ नका !

पू. संदीप आळशी

‘अनेक वर्षांपासून साधना करत असलेले अनेक साधक बर्‍याचदा इतरांमधील दोषच अधिक पहात असतात. त्यामुळे अशा साधकांना इतरांविषयी प्रतिक्रिया येतात किंवा ते त्यांच्याविषयी टीकात्मक बोलतात अथवा विकल्प पसरवतात. असे करणार्‍या साधकांचे मन कलुषित होऊन वृत्ती बहिर्मुख होते. यामुळे त्यांचे ईश्वरी अनुसंधानही टिकून रहात नाही. साधकांचे इतरांमधील दोष पहाणेच अधिक होत असेल, तर त्यांनी त्या वेळी गुरु किंवा देव यांची क्षमायाचना करून प्रार्थना करावी, ‘प्रभु, तुम्हीच त्या साधकाला सद्बुद्धी द्या; पण मला ईश्वरी अनुसंधानातच स्थिर करा.’ साधकांनी दोष-निर्मूलनासाठी स्वयंसूचना देण्यासह इतरांचे गुण आठवायचाही प्रयत्न करावा, म्हणजे त्यांचे मन इतरांविषयीच्या नकारात्मक विचारांतून लवकर बाहेर पडते.’

– (पू.) संदीप आळशी (१८.१२.२०२२)