ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची अमृतवाणी

आज, १८.१२.२०२२ या दिवशी ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने…

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

१. ‘भक्त प्रारब्ध टाळू शकतो; पण तो देहाला विसरला असल्याकारणाने देहाचे भोग भोगणे आणि न भोगणे या दोन्हींची त्याला काळजी नसते; म्हणून तो भोग टाळत नाही.’
२. दुसर्‍यापासून सुख मिळवण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य हा प्रपंची होय.
३. जो मनुष्य प्रपंचातील आपला अनुभव जमेस धरत नाही, तो कशानेच शहाणा होत नाही.’

(साभार : मासिक ‘धार्मिक’, दीपावली विशेषांक २०१८)