खरे सुख (आनंद) देणारे सद्गुरु !

‘जगातील सर्व वैज्ञानिक, सत्ताधीश आणि सर्व धनवान् लोक मिळूनही एका माणसाला तितके सुख देऊ शकत नाही की, जे सुख सद्गुरु केवळ दृष्टीक्षेपाने सत्शिष्याला देऊ शकतात.

सद्गुरूंनी कूर्मदृष्टीने शिष्याची जोपासना करणे

‘तप आणि शुद्धी यांतून निर्माण होणार्‍या क्रिया सद्गुरु त्रयस्थपणे दुरूनच पहात असतात आणि त्यांतून उत्सर्जित होणार्‍या कला शिष्य स्वतः अनुभवत असतो.

कृपा आणि भक्त

‘मी असमर्थ आहे’, ही जाणीव नाहीशी होणे आणि ‘जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात मी अपूर्ण नाही’, ही जाणीव म्हणजे ‘कृपा’ होय. साधक भगवंतमय होऊन जातो. तो बाहेरच्या संघर्षाला भीत नाही.

जन्म-मरणातून सोडवते तीच खरी विद्या !

‘एकदा भोज राजाने एका रत्नपारख्याला बक्षीस देण्याची आज्ञा दिली, ‘‘मंत्री ! या रत्नपारख्याने हिरे पारखण्यात अतुल्य चमत्कार दाखवला आहे. तुम्हाला जे योग्य वाटेल ते बक्षीस याला द्या.

मंत्रामुळे (नामजपामुळे) स्वतःभोवती एक सुरक्षा कवच सिद्ध होते !

मंत्रामुळे/जपामुळे तुमच्यातील सगळी सकारात्मक ऊर्जा बाहेर येते. म्हणूनच त्याला ‘मंत्र कवच’ म्हणतात. मंत्रामुळे स्वतःभोवती एक सुरक्षा कवच सिद्ध होते. नामात साधक एकरूप होत असल्याने अहंकाराचा नकळत लय होतो.

परमेश्वराचे नाम हेच मनाच्या शुद्धीकरणाचे अत्यंत स्वस्त आणि प्रभावी साधन !

वाईट किंवा विषयाच्या वासनेने बुद्धी भ्रष्ट करणे, हेच कलीचे मुख्य लक्षण होय. त्याच्या मुळावर घाव घालण्याचे काम नाम घेतल्याने होते; म्हणून नामधारकाला कलीची बाधा नाही आणि प्रारब्धाची क्षिती (चिंता) नाही.

कुणाचे स्वभावदोष बघून त्याची घृणा करू नका आणि त्याचे वाईट चिंतू नका ! 

कुणाचे स्वभावदोष बघून त्याची घृणा करू नका आणि त्याचे वाईट चिंतू नका. दुसर्‍यांची पापे उघडी करण्यापेक्षा उदारपणे त्यावर पांघरूण घाला.

पाश्चात्त्यांप्रमाणे भारतात नश्वर शरीराच्या पोषणासाठी चाललेली आंधळी धावपळ !

‘सध्या भारतात जिथे पहावे, तिथे स्थूल शरिराचा भोग, स्थूल ‘मी’चे पोषण आणि नश्वर पदार्थांच्या मागे आंधळी धावपळ चालली आहे. शाश्वत आत्म्याचा घात करून नश्वर शरिराच्या पोषणासाठीच संपूर्ण जीवन, अक्कल आणि बुद्धीमत्ता लावली जात आहे.

सीतास्वयंवराच्या वेळी भंग पावलेल्या धनुष्यासमवेत झालेले श्रीरामाचे संभाषण !

माझे दोन तुकडे झाले; पण त्या तुकड्यांमुळे दोन जिवांचे (राम-सीतेचे) मीलन झाले.

नाम घेणे म्हणजे सद्गुरूंच्या हातात स्वतःचा हात देणे होय !

एका नामामध्ये भगवंताच्या दर्शनासाठी लागणारे सर्व गुण आहेत.