सद्गुरूंनी कूर्मदृष्टीने शिष्याची जोपासना करणे

‘तप आणि शुद्धी यांतून निर्माण होणार्‍या क्रिया सद्गुरु त्रयस्थपणे दुरूनच पहात असतात आणि त्यांतून उत्सर्जित होणार्‍या कला शिष्य स्वतः अनुभवत असतो. सद्गुरु प्रत्यक्षात कूर्मदृष्टीने शिष्याची जोपासनाच करत असतात. केवळ आधाराचा हात देऊन साधनेतून निर्माण होणार्‍या आघातांना स्वतः तोंड देण्यास समर्थ अशी सबलता शिष्याच्या ठिकाणी सद्गुरु निर्माण करतात.’

– स्वामी विद्यानंद

(साभार : ग्रंथ ‘चिंतनधारा’)