निरपेक्षतेने प्रयत्न करण्यात आनंद आहे ! 

‘आनंद हा फलप्राप्तीमध्ये नाही, तर तो निरपेक्षतेने प्रयत्न करण्यात आहे. असे प्रयत्न करत राहिलो, तर ‘फळ कधी मिळाले ?’, हे लक्षातही येणार नाही.’ – श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

सत्‌शिष्याचे कल्याण 

‘कल्याण’ ही शाश्वत सौख्यदशा तर आहेच; परंतु ती निर्मळ शांतीची अवस्था आहे आणि त्याच समवेत निखळ ज्ञानदृष्टी आहे

gurupournima

आपले यश हे भगवंताच्या कृपेचे फळ समजावे !

सर्व वैभव रामाच्या कृपेने आलेले आहे’, अशी जाणीव ठेवून त्याविषयी रामाचे उतराई होण्यातच मनुष्यदेहाचा खरा पुरुषार्थ आहे.

राग-द्वेष क्षीण करा !

राग-द्वेष कमी केल्याने सामर्थ्य येते. राग-द्वेष क्षीण करण्यासाठी ‘सर्व आपले आहेत, आपण सर्वांचे आहोत’, अशी भावना ठेवा.

विकार आवरून नाम घ्यावे !

श्रीमहाराज ही गोष्ट सांगून म्हणत, ‘भगवंताच्या नामास शांतीचे थंड, मधुर जल घाला. त्याने ते झाड पुष्कळ फोफावेल. आपण त्याला कढत आणि विषारी विकारांचे पाणी घालतो. त्यामुळे ते झाड वाढत नाही. ते मरत नाही; कारण ते अमरकंद आहे; पण त्याची वाढ नको का व्हायला !’

सेवा, प्रेम, दान, एकांत आणि आत्मविचार यांचे महत्त्व

‘सेवेने आपण संसाराच्या कामी येतो. प्रेमाने भगवंताच्या कामी येतो. दानामुळे दात्याला पुण्य आणि औदार्याचे सुख मिळते. एकांत आणि आत्मविचार यांनी आपण परमेश्वराचा साक्षात्कार करून जगाच्या कामी येतो.’ – संतवचन

कुणी खरोखरच उपाशी असेल, त्याला स्वतः उपाशी राहून खाऊ घातल्यास विलक्षण आनंद मिळेल !

आपल्यापेक्षा लहानांशी उदारतेनी व्यवहार करा. दीन-हीन, गरीब आणि भुकेल्यांना अन्नदान करण्याची संधी मिळाली, तर ती सोडू नका. कुणी खरोखरच उपाशी असेल, तर त्याला स्वतः उपाशी राहूनही खाऊ घाला. तेव्हा स्वतः उपाशी रहाण्यातही विलक्षण आनंद वाटेल.

अक्कलकोट (जिल्हा सोलापूर) येथील स्वामी समर्थ यांचे आध्यात्मिक सुविचार

एकदा स्वामींना विचारले, ‘‘तुमच्या देवाचे नाव काय ?’’ ते म्हणाले, ‘‘आमच्या देवास ‘नृसिंहसरस्वती’ म्हणतात. माझे नाव ‘नृसिंहभान’ आहे.’’ तुझे मोठेपण तुझ्या घरात, येथे मोठेपण कशास पाहिजे ? असे बुदबलचे राजे आम्ही पुष्कळ बनवतो.

नामजपाचे महत्त्व !

‘देवपूजा करणे, संतांची पाद्यपूजा किंवा त्यांच्या पादुकांचे पूजन करणे यांसारख्या उपासनेच्या कृती करतांनाही मनाची एकाग्रता असेल, तरच त्यांचा पूर्ण लाभ होतो. मनाची एकाग्रता नामजपाने साध्य होते.

सद्गुरूंची ‘वृत्ती’ !

सद्गुरूंचे बळ निवृत्तीत असते. सहजप्राप्त असेल, तर उपभोगाचा आनंद सद्गुरु घेतील; पण ते प्राप्तीच्या मागे लागणार नाहीत.