कृपा आणि भक्त

‘मी असमर्थ आहे’, ही जाणीव नाहीशी होणे आणि ‘जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात मी अपूर्ण नाही’, ही जाणीव म्हणजे ‘कृपा’ होय. साधक भगवंतमय होऊन जातो. तो बाहेरच्या संघर्षाला भीत नाही. आंतरिक संघर्ष मावळतो; पण हे दोन्ही संघर्ष मावळण्यासाठी भक्त व्हावे लागते, तसेच जो विभक्त असत नाही, तो ‘भक्त.’ जो उपास्य दैवताविना वेगळा नाही, त्याच्याविना विचार करू शकत नाही, श्वासोच्छ्वास करू शकत नाही, तो भक्त. ज्या ठिकाणी स्वाभाविक विरक्ती सिद्ध झाली, तो भक्त.

– प्रा. गुरुनाथ विश्वनाथ मुंगळे, कोल्हापूर (साभार : ‘गुरुबोध’ ग्रंथातून)