जुन्नर येथे धर्मांधांकडून मंदिराच्या समोर एकमेकांना अंडी मारून वाढदिवस साजरा

जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे मुक्ताई मंदिरासमोर १३ डिसेंबरला रात्री साडे ९ वाजता एकमेकांवर अंडी मारून वाढदिवस साजरा करणार्‍या ६ धर्मांधांवर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

सरपंचपदाची आरक्षण सोडत पुढे ढकलली

जिल्ह्यातील सरपंचपदासाठीची आरक्षण सोडत १६ डिसेंबर या दिवशी तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी आयोजित केली होती. ही आरक्षण सोडत स्थगित करण्यात आली आहे.

सावंतवाडी वनविभाग बचतगटांच्या साहाय्याने हाती घेणार जंगलात मिळणार्‍या फळांवर प्रक्रिया आणि विक्री करण्याचा उपक्रम

येथील वनविभाग स्थानिक जंगल परिसरात मिळणार्‍या फळांवर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प राबवत आहे. याचे दायित्व येथील महिला बचतगटाकंडे देण्यात येणार आहे. यासाठी लागणारी यंत्रसामुग्री, ‘पॅकिंग’ आणि मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे दायित्व वनविभागाचे असणार आहे.

निधन वार्ता

सनातन संस्थेच्या साधिका रंजना नामदेव शिंदे (वय ४८ वर्षे) यांचे १५ डिसेंबर या दिवशी कर्करोगाच्या व्याधीमुळे निधन झाले.

सांगवे-कनेडी बाजारपेठेतील अवैध व्यवसाय बंद करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांची कणकवली पोलीस ठाण्यावर धडक

अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून अवैध व्यवसाय का बंद करत नाही ?

पाळी, कोठंबी येथे खनिज मालाने भरलेले जहाज बुडाले

पाळी-कोठंबी येथे तिशे धक्क्यावर खनिज मालाने भरलेले जहाज १५ डिसेंबर या दिवशी सायंकाळी मांडवी खाडीत बुडाले. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार जहाजावर असलेल्या १० खलाशांनी पोहून तट गाठल्याने ते सुरक्षित राहिले.

गोव्यात निवडणूक आचारसंहिता मागे घेतली

जिल्हा पंचायत निवडणुकीमुळा लागू करण्यात आलेली आचारसंहिता निवडणूक आयोगाने १५ डिसेंबर या दिवशी मागे घेतली आहे.

कृषी विधेयकाला होणारा विरोध आणि त्याच्या विरोधातील अफवा चुकीच्या ! – खासदार नारायण राणे, भाजप

देशातील उत्पादित मालाला दुप्पट भाव मिळावा, तसेच शेतकरी आर्थिकदृष्ट्या समृद्ध व्हावा, यासाठी केंद्र सरकारने कृषी विधेयक संमत केले आहे. त्यामुळे त्याला होणारा विरोध चुकीचा आहे. या कायद्याच्या विरोधात पसरवल्या जाणार्‍या अफवा आणि केली जाणारी अपकीर्ती चुकीची आहे.

विकास योजनेचा निधी कोरोनावरील उपाययोजनांकडे वळवण्याच्या केंद्रशासनाच्या निर्णयाला आव्हान देणार्‍या याचिकाकर्त्याला न्यायालयाकडून १ लाख रुपयांचा दंड

लोकसभा सदस्य स्थानिक क्षेत्र विकास योजनेचा निधी कोरोनाच्या विरोधात लढा देण्याकडे वळवण्याच्या केंद्रशासनाच्या निर्णयाला आव्हान देणार्‍या व्यक्तीला मुंबई उच्च न्यायालयाने १ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

पितांबरीच्या ‘इंद्रधनु व्हिलेज’चे भूमीपूजन पार पडले !

‘पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा.लि.’ यांच्या वतीने दापोलीजवळ साखळोली येथे ‘इंद्रधनु व्हिलेज’ या नावाने १०१ बंगल्यांचा प्रकल्प चालू करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे भूमीपूजन पितांबरीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांच्या हस्ते करण्यात झाले.