श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची आमदार सुधीर गाडगीळ जनसंपर्क कार्यालयास सदिच्छा भेट !

सातारा येथील भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी ३० नोव्हेंबर या दिवशी सांगली येथील भाजपचे आमदार श्री. सुधीर गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली.

मुंबईमध्ये पांडुरंग सकपाळ यांच्याकडून ‘ऑनलाईन’ अजान स्पर्धेचे आयोजन

अजानची स्पर्धा काफिरांनी आयोजित करणे इस्लामला मान्य आहे का ? अशी स्पर्धा आयोजित करण्यापूर्वी ‘इस्लामी धर्मगुरूंचे मत काय आहे ?’, हे जाणून घेतले असते, तरी ही स्पर्धा आयोजित करण्याचा खटाटोप केला नसता !

अवैध पशूवधगृह चालकांवर तात्काळ कारवाई करण्याविषयी पाळधी (जळगाव) येथील ग्रामस्थ आणि हिंदुत्वनिष्ठ यांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन !

अवैध पशूवधगृह बंद करण्यासाठी ग्रामस्थ आणि हिंदुत्वनिष्ठ यांना निवेदन का द्यावे लागते ? प्रशासन स्वतःहून कृती का करत नाही ?

सिंधुदुर्गातील सर्व न्यायालयांचे कामकाज आजपासून पूर्ववत् चालू होणार

कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर सरकारने घातलेल्या नियमांनुसार आतापर्यंत न्यायालयांचे कामकाज चालू होते. आता उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार जिल्ह्यातील जिल्हा मुख्यालय आणि तालुका न्यायालये १ डिसेंबरपासून सकाळी १०.३० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत पूर्ववत् चालू करण्यात येणार आहेत.

सिंधुदुर्गातील कोरोनाबाधितांची स्थिती

गेल्या २४ घंट्यांत १९ नवीन रुग्ण आढळले.
आतापर्यंतचे एकूण कोरोनाबाधित रुग्ण ५ सहस्र २८५

सांगली-कोल्हापूर जिल्ह्यांत कोरोनाची स्थिती दिलासाजनक !

गेल्या ४ दिवसांपासून सांगली-कोल्हापूर जिल्ह्यांत कोरोनाची स्थिती दिलासाजनक आहे. गेल्या ३ दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही, तसेच रुग्ण संख्याही सातत्याने घटत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात इचलकरंजी आगार अव्वल : दिवाळी प्रवासी हंगामात ८९ लाख रुपयांचे आर्थिक उत्पन्न !

दिवाळीचा हंगाम यंदा इचलकरंजी आगाराला अनुकूल ठरला आहे. दिवाळीच्या प्रवासी हंगामात आगाराला ८९ लाख रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळाले आहे. कोरोना काळातही मिळालेल्या या उत्पन्नामुळे इचलकरंजी आगार कोल्हापूर जिल्ह्यात अव्वल ठरला आहे.

शेतकरी आणि कामगार सुधारणा कायद्याच्या विरोधात आंदोलन करणार्‍या आंदोलकांवर गुन्हा नोंद

केंद्र सरकारने शेतकरी आणि कामगार कायद्यात केलेल्या सुधारणांच्या विरोधात २६ नोव्हेंबर या दिवशी पिंपरी येथील बाबासाहेब आंबेडकर चौकात कामगारांनी निषेध व्यक्त केला.

कोरोनाशी संबंधित अहवाल येण्यापूर्वीच माणगाव हायस्कूल चालू केल्याने पालक, विद्यार्थी आणि शिक्षक यांचे आरोग्य धोक्यात 

शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचा कोरोनाशी संबंधित अहवाल येण्यापूर्वीच मुख्याध्यापक आणि संस्था प्रशासन यांनी माणगाव हायस्कूल चालू केले.

सिंधुदुर्गात १ डिसेंबरपासून क्षयरोग आणि कुष्ठरोग रुग्ण शोधमोहीम

जिल्ह्यात क्षयरोग आणि कुष्ठरोग रुग्ण शोधमोहीम राबवण्याकरता ७ लाख ३४ सहस्र ३१४ इतक्या लोकसंख्येचे सर्वेक्षण ‘आशा’ स्वयंसेविका आणि पुरुष स्वयंसेवक यांच्या पथकाद्वारे करण्यात येणार आहे.