सांगली येथे काळ्या खणीतून १५ दिवसांत महापालिका कर्मचार्यांनी १३ टन कचरा काढला !
सांगली – सांगलीच्या मध्यवर्ती असणारी काळी खण गेल्या अनेक वर्षांपासून प्रदूषणाच्या विळख्यात सापडली होती.
सांगली – सांगलीच्या मध्यवर्ती असणारी काळी खण गेल्या अनेक वर्षांपासून प्रदूषणाच्या विळख्यात सापडली होती.
लाच स्वीकारल्याच्या प्रकरणी कुडाळ तालुक्यातील कसाल मंडल अधिकारी संदीप पांडुरंग हांगे यांना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी निलंबित केले आहे. कायदेशीर खरेदी केलेल्या भूमीच्या खरेदी खताची सातबारावर नोंद करण्यासाठी संदीप हांगे यांनी संबंधिताकडे ४ सहस्र रुपयांची लाच मागितली होती.
महाराष्ट्राचे ऊर्जा, आदिवासी विकास, उच्च आणि तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभागाचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी जिल्ह्यातील ‘बोरगाव कृषी विज्ञान केंद्रा’ला भेट देऊन पहाणी केली. तसेच विविध उपक्रमांची माहिती घेऊन शेतकर्यांशी संवाद साधला.
कोरोनाच्या दुसर्या साथीचा धोका रोखण्यासाठी महापालिका क्षेत्रात आरोग्य सर्वेक्षण आणि ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’वर भर देण्याच्या सूचना महापालिका आरोग्य विभागाने दिल्या आहेत.
कोरोनाच्या रुग्णांचा वाढता आकडा आणि अंगारकी चतुर्थीला होणारी संभाव्य गर्दी यांमुळे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी उपाय म्हणून तीर्थक्षेत्र चिंचवडगाव येथील मोरया गोसावी मंदिर भाविकांना दर्शनासाठी २ मार्च या दिवशी बंद रहाणार आहे.
लसीकरणाचे नियोजन भोंगळपणे करणे, हे प्रशासनाला लज्जास्पद! ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणासाठी त्रास सोसावा लागणे, हे शासनाला लज्जास्पद आहे !
सुरूर येथे पारधी वस्ती आहे. गत अनेक वर्षांपासून जक्कल रंगा काळे हे या वस्तीमध्ये रहातात. काळे यांनी २८ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी ५ वाजता वाई बसस्थानकावर एका प्रवासी कुटुंबावर आक्रमण केले;
पथकरमुक्तीसाठीचा निर्णय शासन स्वतःहून का घेत नाही ? यासाठी इतरांना लक्ष का द्यावे लागत आहे ?
तालुक्यातील वायरी, भूतनाथ येथे एका पर्यटन व्यावसायिकाचे रस्त्यात सापडलेले तब्बल दीड लाख रुपये येथील प्रमोद सावळाराम हडकर यांनी त्या व्यावसायिकाला परत केले. घरची परिस्थिती बेताची असलेल्या हडकर यांच्या या प्रमाणिकपणाविषयी त्यांचे गावात कौतुक केले जात आहे.
हत्यांचे लोण आपल्या घरात येण्याची चिंता करणारे दलवाई काश्मीर येथे हिंदूंचा वंशविच्छेद होत असतांना, इस्लामी आतंकवादामुळे शेकडोंनी बळी गेलेले असतांना कधी असे बोलले नाहीत.