क्षत्रिय मराठा रियासत फौंडेशनच्या वतीने १ सहस्र लोकांना अर्सेनिक अल्ब ३० गोळ्यांचे वाटप
क्षत्रिय मराठा रियासत फौंडेशनच्या ८ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने १ सहस्र लोकांना अर्सेनिक अल्ब ३० या रोगप्रतिकारक गोळ्या आणि मास्क यांचे वितरण करण्यात आले.
क्षत्रिय मराठा रियासत फौंडेशनच्या ८ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने १ सहस्र लोकांना अर्सेनिक अल्ब ३० या रोगप्रतिकारक गोळ्या आणि मास्क यांचे वितरण करण्यात आले.
हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानाचे तत्त्व १ सहस्र पट अधिक असते. हे लक्षात घेऊन धर्मशिक्षणवर्ग आणि सत्संग यांमध्येही संकट निवारणासाठी हनुमानाच्या पूजनाचे शास्त्र, त्याच्या जपाचे महत्त्व, साडेसाती निवारणासाठी मारुतीची पूजा कशी करावी आदींविषयी माहिती सांगण्यात आली.
वाडा तालुक्यातील डाहे गावातील अंगणवाडी केंद्रात काम करणार्या एका मदतनीस महिलेला कामावर कायमस्वरूपी करण्यासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी गोरक्ष खोसे यांनी २१ सहस्र रुपयांची लाच मागितली होती.
पुणे शहरातील जलपर्णी काढण्यासाठी मनपाच्या वतीने कोट्यवधी रुपयांचा व्यय
कोल्हापूर जिल्ह्यात, जिल्ह्याबाहेरील उपचार घेणार्यांच्या रुग्णांची संख्या लक्षणीय असून व्हेंटिलेटर बेडवर परराज्यातील रुग्ण उपचार घेत आहेत.
महसूल बुडवणाऱ्या आस्थापनाला पाठीशी घालणाऱ्यांना तसेच भ्रष्टाचाराला खतपाणी घालणाऱ्या तहसीलदारांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे !
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या वतीने प्रथम सत्राच्या ‘ऑनलाईन’ परीक्षेकरिता ‘लॉग इन’ होत नसल्याच्या अनुमाने ९ सहस्र तक्रारी परिक्षार्थींनी दाखल केल्या आहेत. ‘लॉग इन’ होत नसल्याने पेपर लिहिता येत नाही.
बोरिवली येथील गीतांजली जैन मंदिरात पहाटे ५ वाजता श्री. प्रकाश शहा यांनी जैन धर्माची दीक्षा घेत मुनी बनण्याचा मार्ग स्वीकारला. ते ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’सारख्या एका मोठ्या आस्थापनात उच्च पदावर काम करत होते; मात्र मोठ्या वेतनाची नोकरी सोडून त्यांनी मुनी होण्याचा मार्ग स्वीकारला आहे.
जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा निर्माण झाला असून येळंबघाट येथील लसीकरण केंद्रावर २८ एप्रिल या दिवशी सकाळी ११ वाजता अचानक नागरिकांची गर्दी उसळली. यामुळे सामाजिक अंतरांचे पालन होत नसल्याने पोलिसांना बोलवावे लागले.